करोनामुळे देशभरात टाळेबंदी लागू केल्यामुळे घ्याव्या लागलेल्या सक्तीच्या दीर्घ विश्रांतीनंतर खेळणे वेगवान गोलंदाजांसाठी आव्हानात्मक ठरेल, असे मत भारताचा माजी वेगवान गोलंदाज आशीष नेहराने व्यक्त केले.

‘‘फलंदाजाला घरगुती सराव काही प्रमाणात तरी करता येऊ शकतो, परंतु तीन महिन्यांहून अधिक काळ धावण्याचा सराव नसल्यास वेगवान गोलंदाजावर त्याचा गंभीर परिणाम होतो,’’ असे नेहराने सांगितले.

देशभरात लागू करण्यात आलेल्या तीन आठवडय़ांच्या टाळेबंदीचा दुसरा सप्ताह सुरू आहे. याबाबत नेहरा म्हणाला, ‘‘टाळेबंदी १५ एप्रिलपर्यंत संपुष्टात आली, तर  जनजीवन पूर्ववत व्हायला आणखी बराच वेळ लागेल. जुलैपर्यंत मैदानावर सराव करणे कठीण जाईल, असा माझा अंदाज आहे. परंतु वेगवान गोलंदाजांसाठी तंदुरुस्त राहण्याचे सर्वात मोठे आव्हान असेल.’’

‘‘सध्याची स्थिती अपरिहार्य आहे. त्यामुळे घराबाहेर १५ ते २० मीटरची मोकळी जागा असलेल्या क्रि के टपटूला काही प्रमाणात तरी सराव करता येईल,’’ असे नेहरा म्हणाला.

‘‘योगा किं वा भारोत्तलन करणे गोलंदाजांसाठी शक्य आहे. गोलंदाजीच्या प्रक्रि येत धावताना संपूर्ण शरीराचे अवयव कार्यरत होता. गोलंदाजीचा कल्पनारम्यतेत सराव करणे गोलंदाजांसाठी उपयुक्त ठरेल,’’ असे नेहराने सांगितले. नेहराने  १७ कसोटी, १२० एकदिवसीय आणि २७ ट्वेन्टी-२० सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व के ले आहे.

गच्चीवर सराव करणाऱ्या क्रि के टपटूंनाही नेहराने महत्त्वाचा सल्ला दिला आहे. ‘‘गच्चीवर सूर्यनमस्कार घालता येऊ शकतो, परंतु तुम्ही  गोलंदाजीची दीर्घ धाव घेण्याचा सराव के ल्यास गुडघा किं वा पायाच्या घोटय़ासाठी ते हानिकारक ठरू शकते. त्यामुळेच व्यावसासिक टेनिसपटू पंचतारांकित हॉटेल्सच्या हार्ड कोर्टवर सराव करायला टाळतात,’’अशी माहिती नेहराने दिली.

‘‘जूनपासून जनजीवन पूर्वपदावर आले तरी क्रि के टपटूला मैदानावर सामन्यासाठी सज्ज होण्यास एक महिन्याचा कालावधी लागेल. टाळेबंदी उठल्यावर लगेच मैदानावर कोणताही खेळाडू सामना खेळू शकणार नाही,’’ असे नेहराने सांगितले.