28 September 2020

News Flash

…म्हणून ३७व्या वर्षीही हा खेळाडू खेळतोय क्रिकेट

एका मुलाखतीत सांगितलं यामागचं कारण

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी जुलै २०१९ नंतर क्रिकेटच्या मैदानात उतरलेला नाही. मार्च महिन्यात चेन्नई सुपर किंग्जच्या सहकाऱ्यांसोबत त्याने काही काळ सराव केला पण नंतर करोनामुळे धोनी लॉकडाउममध्ये अडकला. करोनाच्या भीतीपोटी टी-२० विश्वचषक रद्द करण्यात आला. त्यामुळे धोनीचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पुनरागमन लांबलं. पण आता धोनीव्यतिरिक्त आणखी एक खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमनाच्या प्रतिक्षेत आहे.

भारताचा फिरकीपटू अमित मिश्रा याने नुकतेच एका मुलाखतीत टीम इंडियातील पुनरागमनाबद्दल मत सांगितलं. ” ३७ वर्षांचा असूनही मी केवळ टीम इंडियात पुनरागमन करण्याच्या उद्देशाने क्रिकेट खेळतो आहे. मी असा खेळाडू नाही जो फक्त IPLसाठी क्रिकेट खेळत राहीन. माझा लढा माझ्याशीच आहे. टीम इंडियाकडून जेव्हा मला पुनरागमनाची संधी मिळेल तेव्हा मी सज्ज असायला हवा असं मला वाटतं. मला विश्वास आहे की मला नक्की संधी मिळेल. मी अजूनही भारतासाठी खेळण्याबाबत आशावादी आहे”, असे अमित मिश्राने ‘क्रिकेटडॉटकॉम’शी बोलताना सांगितलं.

“मी अनेकवेळा विचार करतो की मला संधी न मिळाल्याने कोणाचा फायदा होईल? मला नेहमी उत्तर मिळतं की यात माझ्या प्रतिस्पर्ध्यांचा फायदा होतो. त्यामुळे जेव्हा जेव्हा मला पुनरागमनाची संधी नाकारली जाते, तेव्हा मी कायम दुप्पट प्रयत्न करतो. मी कायम नकारात्मक विचारांपासून दूर राहतो. माझ्या आयुष्यात मला पाठिंबा देणारे बरेच आहेत. त्यांनी मला शिकवलं आहे की जितका जास्त प्रयत्न करशील तितकी संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे मी क्रिकेट खेळतो आहे”, असेही तो म्हणाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2020 2:48 pm

Web Title: playing cricket only for team india comeback reveals spinner amit mishra vjb 91
Next Stories
1 IPL 2020 : मोठ्या विश्रांतीनंतर धोनी सरावासाठी मैदानात
2 Video : भन्नाट! अब्बासने ‘असा’ उडवला स्टोक्सचा त्रिफळा
3 T20 : हा आहे ‘टीम इंडिया’कडून हॅटट्रिक घेणारा एकमेव गोलंदाज
Just Now!
X