मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये न्यूझीलंडचा जेम्स नीशम हा एक उत्तम अष्टपैलू खेळाडू आहे. असे असूनही किंग्ज इलेव्हन पंजाबने IPL 2020साठी त्याला ५० लाखांच्या मूळ किमतीला खरेदी केले. यापूर्वी नीशमने दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि कोलकाता नाईट रायडर्सचे प्रतिनिधित्व केले होते. पण या स्पर्धेत त्याला अद्याप म्हणावी तशी छाप पाडता आलेली नाही. पण सोशल मीडियावर मात्र तो आपली ओळख आणि लोकप्रियता टिकवून आहे. नुकतेच त्याने एका पाकिस्तानी चाहत्याला दिलेलं उत्तर चर्चेचा विषय ठरत आहे.
IPL २०२० मध्ये नीशम खेळणार आहे हे नक्की आहे. पण त्याने पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नकार दर्शवला आहे. यावरूनच एका पाकिस्तानी चाहत्याने नीशमला प्रश्न विचारला. इतकंच नाही तर त्याला बोलण्यासाठी उद्द्युक्त करणारा एक आरोपही केला. “नीशम, तू IPL खेळतोस, मग PSL मध्ये खेळण्यास तुझा नकार का? IPLमुळे जास्त पैसा आणि लोकप्रियता मिळते म्हणून तू PSL खेळत नाहीयेस, हे खूप वाईट आहे”, असे त्या पाकिस्तानी चाहत्याने ट्विट केले. त्यावर नीशमने त्याला झकास उत्तर देत गप्प केलं. “PSL चे आयोजन न्यूझीलंडच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या वेळीच असते हेदेखील कारण असू शकतं”, असं खोचक उत्तर त्याने दिलं.
Or because PSL is in the middle of our home summer? https://t.co/kab4La5vlX
— Jimmy Neesham (@JimmyNeesh) August 31, 2020
दरम्यान, World Cup 2019 मध्ये अंतिम फेरीत नीशमने आपल्या संघाला विजयासमीप नेण्यास खूप प्रयत्न केले होते. त्याने चांगली फलंदाजी केली होती, तसेच गोलंदाजीतही दमदार कामगिरी केली होती. पण सुपर ओव्हरमध्ये गप्टील धावबाद झाल्यानंतर ICCच्या नियमांनुसार इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आले होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 1, 2020 10:09 am