30 November 2020

News Flash

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनवर प्रशासक नेमा; क्रिकेट प्रशासकीय समितीचा सर्वोच्च न्यायालयाला अहवाल

लोढा समितीच्या शिफारसींची अंमलबजावणी करण्यात टाळाटाळ केल्यामुळे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनवर प्रशासक नेमण्याची मागणी करण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचं मैदान (संग्रहीत छायाचित्र)

सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयवर स्थापन केलेल्या क्रिकेट प्रशासकीय समितीने, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनवर प्रशासक नेमण्याची मागणी आपल्या अहवालात केली आहे. प्रशासकीय समितीने सर्वोच्च न्यायालयात आज आपला आठवा कार्य अहवाल सादर केला. यात न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी, तसेच लोढा समितीच्या शिफारसींची अंमलबजावणी करण्यात टाळाटाळ केल्यामुळे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनवर कारवाई करत प्रशासक नेमण्याची मागणी करण्यात आलेली आहे.

याआधी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सचिव रियाझ बागवान यांनी आपल्या संघटनेशी संलग्न सर्व संघटनांना पत्र पाठवून, २ मे रोजी नवीन घटनेनुसार निवडुणका पार पडणार असल्याची माहिती दिली होती. मात्र प्रशासकीय समितीने नवीन घटनेचा अभ्यास करुन, त्यातीह काही त्रुटी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला कळवल्या होत्या. या त्रुटी न सुधारल्यास प्रशासकीय समितीने २ मे रोजी होणारी निवडणुक रद्द करण्यात येईल असा इशाराही दिला होता. मात्र प्रशासकीय समितीच्या या सुचनांकडे दुर्लक्ष केल्यामुळे प्रशासकीय समितीने कठोर पावलं उचलत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनवर प्रशासक नेमण्याची मागणी केल्याचं समजतं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2018 7:24 pm

Web Title: please appoint administrator for maharashtra cricket association coa appeals to supreme court
टॅग Mca
Next Stories
1 महाराष्ट्र पोलिसांची नाशिक आर्मीवर मात
2 RCB ने मला धोका दिला – ख्रिस गेल
3 IPL 2018 – आयपीएलच्या ट्रॉफीवरील ‘या’ संस्कृत ओळीचा अर्थ माहिती आहे?
Just Now!
X