भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जाडेजाने नुकतीच आपली पत्नी रिवाबासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. आपल्या या भेटीचे फोटो रविंद्र जाडेजाने ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. रविंद्र जाडेजाची पत्नी रिवाबाची नुकतीच गुजरात करणी सेनेच्या महिला प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र या भेटीमागचं नेमकं कारण अजुन समजलेलं नाहीये.

2017 साली इंग्लंडमध्ये पाकिस्तानविरुद्ध चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत झालेल्या पराभवानंतर जाडेजा संघाबाहेर फेकला गेला होता. मात्र यानंतर जाडेजाने दमदार पुनरागमन करत संघात आपलं स्थान पक्क केलं आहे. नुकत्याच झालेल्या विंडीजविरुद्ध मालिकेतही जाडेजाने आपली छाप पाडली. यानंतर जाडेजा ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेसाठी रवाना होणार आहे.