नवी दिल्ली : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी ठेवलेल्या गुणांकन पद्धतीवर वेस्टइंडिजचे महान माजी वेगवान गोलंदाज मायकेल होल्डिंग यांनी टीका केली आहे. ही पद्धत हास्यास्पद आहे, असे होल्डिंग यांनी म्हटले आहे.

‘‘गुणांकन पद्धत ही हास्यास्पद आहे. दोन कसोटी सामने खेळून जितके गुण मिळतात तितकेच पाच कसोटींसाठी ठेवण्यात आले आहेत. यास्थितीत जर दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतून जास्त गुण मिळत असतील तर पाच कसोटींची मालिका खेळायला खेळाडू नकारच देतीले,’’ असे मायकेल होल्डिंग यांनी सांगितले.

‘‘अंतिम फेरीसाठी अव्वल दोन संघ पात्र ठरणार आहेत. जेव्हा अंतिम फेरीचे दोन संघ गुणांप्रमाणे दावेदार ठरतील तेव्हा अन्य देशांच्या कसोटी सामन्यांना प्रेक्षकदेखील गंभीरपणे घेणार नाहीत,’’ याकडे होल्डिंग यांनी लक्ष वेधले.