पोलीस ढाल आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना सोमवारी तिसऱ्या दिवशी अनिर्णितावस्थेत संपला; परंतु पहिल्या डावातील १७ धावांच्या आघाडीच्या बळावर एमआयजी क्लबला विजेते घोषित करण्यात आले.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या पार्पोफेने क्रिकेटर्स संघाने पहिल्या डावात ९० षटकांत ८ बाद ३५८ धावा केल्या. त्याला प्रत्युत्तर देताना एमआयजीने गौरव जठारच्या शतकाच्या बळावर ९० षटकांत ६ बाद ३७५ धावा केल्या. मग पार्पोफेने संघाने दुसरा डाव ३२ षटकांत ८ बाद १७३ धावांवर घोषित केला. एमआयजीने ३१ षटकांत ७ बाद १४१ धावा केल्यामुळे सामना अनिर्णित राहिला. स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचे पारितोषिक पार्पोफेने क्रिकेटर्स संघाच्या सागर मिश्राने मिळवले. एमसीए कोल्ट्सचा कौशिक चिलीकर सर्वोत्तम फलंदाज आणि पार्पोफेने क्रिकेटर्सचा प्रदीप साहू सर्वोत्तम गोलंदाज ठरला.

संक्षिप्त धावफलक

पार्पोफेने क्रिकेटर्स (पहिला डाव) : ९० षटकांत ८ बाद ३५८.

एमआयजी क्रिकेट क्लब (पहिला डाव) : ९० षटकांत ६ बाद ३७५ (गौरव जठार नाबाद १५३, केव्हिन डीअल्मेडा ७१; प्रदीप साहू २/९०)

पार्पोफेने क्रिकेटर्स (दुसरा डाव) : ३२ षटकांत ८ बाद १७३ डाव घोषित (अंशुल गुप्ता ५५; निखिल दाते ३/८१).

एमआयजी क्रिकेट क्लब (दुसरा डाव) : ३१ षटकांत ७ बाद १४१ (सुमित घाडिगावकर ३९; प्रदीप साहू ३/६७).