News Flash

फुटबॉलच्या मैदानातही राजकीय वाद!; युरो कपआधीच ‘त्या’ घोषणेवरुन रशिया-युक्रेन आमनेसामने

युक्रेननं आपल्या जर्सीवर क्रीमिया आपल्या देशाचा भाग असल्याचं दर्शवलं आहे. यावर रशियाने आक्षेप घेत आयोजन समितीकडे आपली नाराजी व्यक्त केली आहे.

युक्रेनच्या जर्सीवरील नकाशा आणि घोषणेमुळे रशियाची नाराजी (सौजन्य- Reuters)

कोणतीही स्पर्धा म्हटलं की जोश, हेवदावे, मैदानातील भिडस्तपणा सगळंच रंगात येतं. मात्र जेव्हा दोन शत्रूराष्ट्र स्पर्धेत एकमेकांसमोर उभे ठाकतात तेव्हा त्याला युद्धाचं स्वरुप येतं. मात्र यूरो कप २०२० स्पर्धेपूर्वीच याची ठिणगी पडली आहे. त्याला युक्रेननं स्पर्धेसाठी जाहीर केलेली जर्सी कारणीभूत ठरली आहे. या जर्सीवर असलेली घोषणा आणि नकाशा सध्या वादाचा विषय ठरत आहे. युक्रेननं आपल्या जर्सीवर एक नकाशा दाखवला आहे. त्यात क्रीमिया आपल्या देशाचा भाग असल्याचं दर्शवण्यात आलं आहे. यावर रशियाने यूरो कप आयोजन समितीकडे आपली नाराजी व्यक्त केलली आहे. क्रीमिया आपल्या देशाच्या अविभाज्य भाग असल्याचं रशिया सांगत आहे. रशियाने जर्सीवरून वादग्रस्त नकाशा आणि घोषणा काढण्यास सांगितलं आहे. आयोजन समितीने याची दखल घेत युक्रेनला हा वादग्रस्त नकाशा काढण्यास सांगितलं आहे. २०१४ साली रशियाने क्रीमियावर ताबा मिळवला होता.

युक्रेन फुटबॉल असोसिएशनचे प्रमुख अँड्री पावेल्को यांनी रविवारी सोशल मीडियावर यूक्रेनच्या नव्या जर्सीचं अनावरण केलं होते. पिवळ्या रंगाच्या जर्सीत पांढऱ्या रंगात युक्रेनचा नकाशा दाखवण्यात आला आहे. त्याचबरोबर एक घोषणाही लिहिण्यात आली आहे. ‘युक्रेनचा विजय असो!’ अशी घोषणा यावर लिहिण्यात आली आहे. तर आतल्या बाजूला ‘जवानांचा विजय असो’ अशी घोषणा लिहिण्यात आली आहे. या दोन्ही घोषणा लष्काराच्या सन्मानासाठी वापरल्या जातात.

UEFA Euro Cup फुटबॉलचा इतिहास; ६० वर्षात झाले इतके बदल

युक्रेनच्या या कृतीचा रशियाने निषेध केला आहे. त्याचबरोबर युक्रेन जाणीवपूर्वक असं करत असल्याचा आरोप रशियाकडून करण्यात आला आहे. रशिया क्रीमियावर आपला दावा ठोकत आहे. मात्र रशियाच्या दाव्याला अद्याप आंतरराष्ट्रीय स्वीकृती नाही. युनाइटेड नेशन क्रीमिया युक्रेनचा भाग असल्याचं सांगत आहे. त्यामुळे दोन्ही देशातील वाद मैदानापर्यंत पोहोचल्याचं दिसत आहे.

UEFA Euro Cup 2020: करोनामुळे स्पर्धेच्या नियमात बदल

यूरो कप स्पर्धेच्या ग्रुप ‘बी’मध्ये रशिया आहे. तर ग्रुप ‘सी’मध्ये युक्रेनचा समावेश आहे. त्यामुळे साखळी सामन्यात हे दोन्हीही संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार नाही. मात्र दोन्ही संघाची कामगिरी साखळी सामन्यात चांगली ठरली. तर मात्र बाद फेरीत हे दोन्ही संघ एकमेकांसमोर असतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2021 12:42 pm

Web Title: political controversy on the football field as well slogan and map on ukrain jersey subject of controversy rmt 84
टॅग : Euro Cup 2020
Next Stories
1 UEFA Euro Cup स्पर्धेसाठी गुगलचं खास डुडल!
2 UEFA Euro Cup 2020: करोनामुळे स्पर्धेच्या नियमात बदल
3 UEFA Euro Cup फुटबॉलचा इतिहास; ६० वर्षात झाले इतके बदल
Just Now!
X