उदयोन्मुख धडाकेबाज फलंदाज शाहरुख खानची फटकेबाजी पाहून त्याच्यामध्ये आपल्याला वेस्ट इंडिजच्या किरॉन पोलार्डची झलक दिसते, असे मत पंजाब किंग्जचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी व्यक्त केले.
शाहरुखला पंजाबने ५.२५ कोटी रुपयांत संघात सहभागी केले. ‘‘ज्या वेळी मी मुंबई इंडियन्सच्या संघ व्यवस्थापनाचा भाग होतो. त्या वेळी सरावादरम्यान पोलार्डला गोलंदाजी करताना माझ्या दिशेने फटके मारू नको, असे सांगायचो. आता प्रशिक्षक म्हणून शाहरुखची फलंदाजी पाहताना अन्य गोलंदाजही माझ्याप्रमाणेच विचार करत असतील, असे मला वाटते. फिरकीपटूंविरुद्ध जागेवरूनच षटकार लगावण्याची त्याच्यात क्षमता आहे,’’ असे कुंबळे म्हणाले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 6, 2021 12:15 am