News Flash

विश्वविक्रमी खेळी केल्याचे ‘वॉट्सअ‍ॅप’मुळे समजले-पूनम राऊत

सचिन-सौरभच्या भागिदारीला दिला उजाळा

संघाच्या वॉटसअॅप ग्रुपवरील मॅसेजमुळे आम्ही विश्वविक्रमी खेळी केल्याचे समजले.

भारतीय महिला क्रिकेट संघाच्या दिप्ती शर्मा आणि पूनम राऊत या सलामीच्या जोडीने आयर्लंड विरुद्ध धमाकेदारी कामगिरी करत ३२० धावांची विश्वविक्रमी खेळी केली. या दोघींच्या दमदार खेळीचे सर्वत्र कौतुक झाले. मात्र, मैदानातील ही खेळी विश्वविक्रमी आहे याची या दोन्ही महिला खेळाडूंना कल्पना नव्हती. मैदानावर खेळाडू खेळत असताना त्याची खेळी एक ऐतिहासिक असल्याचे त्याच्या डोक्यात कधीच नसते. या दोन्ही खेळाडूंच्या बाबतीत ही काहीसे असेच झाले. ईएसपीएनला दिलेल्या मुलाखतीमध्ये पूनम म्हणाली की, आम्ही दोघींनी विश्वविक्रम केल्याची आम्हाला कल्पना नव्हती. ३२० धावांची खेळी ही विश्वविक्रम असल्याचे मला वॉट्सअॅपमुळे कळले.

उपुल तरंगा आणि जयसुर्या या श्रीलंकन खेळाडूंच्या नावावर असणाऱ्या २८६ धावांच्या विक्रमाची कल्पना नसल्याचे पूनमने सांगितले. ती म्हणाली की, मला महिला क्रिकेटमध्ये विक्रम कोणाच्या नावे आहे, किंवा श्रीलंकन खेळाडूंच्या नावे सलामीचा विश्वविक्रम आहे, याची माहिती नव्हती. यावेळी पूनमने सचिन आणि सौरभ गांगुलीच्या भागिदारीची आठवण करुन दिली. पूनम म्हणाली की, सचिन-सौरभने सलामीला २५० धावांच्या आसपास भागिदारी कली होती, ही भारतीय क्रिकेटमधील सलामीच्या जोडीने केलेली सर्वोच्च भागिदारी असल्याची जाणीव होती. ती म्हणाली, ज्यावेळी धाव फलकावरील आकडा ३०० च्या जवळ आला, त्यावेळी आम्ही इंग्लड महिला खेळाडू सराह टेलर आणि कॅर्लिन यांच्या २६८ धावांचा विक्रम मागे टाकला हे समजले. संघाच्या वॉटसअॅप ग्रुपवरील मॅसेजमुळे आम्ही विश्वविक्रमी खेळी केल्याचे समजले.

विश्वविक्रमी खेळीनंतर दिप्ती म्हणाली, पॉवर प्ले दरम्यान जोखीम न उचलण्याचे ठरविले होते. तसेच धावांची सरासरी कमी होणार नाही, हा कानमंत्र पूनमने दिला होता. हा मंत्र जपताना खराब चेंडूचा आम्ही चांगलाच समाचार घेतला. शतकानंतर मी आक्रमक खेळण्याचा निर्णय घेतला. सिंगल डब्बल करण्यापेक्षा मोठ्या फटक्यातून धावसंख्या उभारण्यावर भर दिला. यावेळी तिने दिप्तीने केलेल्या खेळीचे कौतुक करताना पुनम म्हणाली, मी दिप्तीसोबत देशांतर्गत सामन्यात अनेकदा खेळले आहे, पण या सामन्यातील तिची खेळी पाहताना तिचे वय आणि खेळी याचा विश्वास बसत नव्हता. दिप्ती शर्मा अवघ्या १९ व्या वर्षाची आहे.
दोघींच्या खेळाच्या जोरावर भारतीय संघाने ५० षटकांच्या अखेरीस आयर्लंडसमोर ३ बाद ३५८ धावांचा डोंगर रचला होता. २७ वर्षीय पुनमने बाद होण्यापूर्वी १०९ धावांची खेळी केली होती. दिप्तीने १६० चेंडूत १८८ धावा केल्या होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2017 4:53 pm

Web Title: poonam raut and deepti sharma world record whatsapp
Next Stories
1 चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारत वेस्ट इंडिज दौऱ्यावर, वेळापत्रक निश्चित
2 ..तर अ‍ॅशेस खेळणार नाही – वॉर्नर
3 Sachin Tendulkar: ऑस्ट्रेलियाविरुद्धची ‘ती’ मालिका आव्हानात्मक – सचिन
Just Now!
X