अनुभवी फिरकीपटू पूनम यादव हिच्या चार बळींच्या जोरावर भारताने यजमान ऑस्ट्रेलियाला धावांनी पराभूत केले. जेमायमा रॉड्रीग्ज (२६) आणि दिप्ती शर्मा (४९*) या दोघींच्या भागीदारीच्या जोरावर भारताने २० षटकात ४ बाद १३२ धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियाला १३३ धावांचे आव्हान दिले. आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर हेली हिने अर्धशतकी केली, पण पूनम यादवच्या फिरकीपुढे यजमान ऑस्ट्रेलियाने गुडघे टेकले. या विजयासह भारताने स्पर्धेत विजयी सलामी दिली.

२ स्टंपिंग अन् २ झेल… तानियाने केली धमाकेदार कामगिरी

१३३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनी सावध सुरूवात केली आणि पहिल्या ५ षटकांत ३० धावांची भागीदारी केली. संयमी सुरूवातीनंतर ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का बसला. अडखळती सुरूवात करत १३ चेंडूत ६ धावा करणारी बेथ मूनी माघारी परतली. ऑस्ट्रेलियन कर्णधार मेग लॅनिंगदेखील स्वस्तात माघारी परतली. सलामीवीर हेली दमदार अर्धशतकानंतर माघारी परतली. हेलीने ३५ चेंडूत ६ चौकार आणि १ षटकारासह ५१ धावा केल्या. पण त्यानंतर ती लगेचच झेलबाद झाली.

फिरकीपटू पूनम यादवने आपला अनुभव पणाला लावत दोन चेंडूत दोन बळी टिपले. तिने आधी रॅचेल हेन्सला (६) बाद केले. तर त्यानंतर दमदार फलंदाज एलिस पेरीला पहिल्याच चेंडूवर तंबूत धाडले. पण तिची हॅटट्रिक यष्टीरक्षकाच्या चुकीमुळे हुकली. तिने टाकलेला चेंडू बॅटला लागला पण किपरला तो झेलता आला नाही. त्यामुळे तिला हॅटट्रिक मिळवता आली नाही. पण तसे असले तरी भारताने मात्र विजयाची हॅटट्रिक केली.

टी २० विश्वचषक स्पर्धेत झालेल्या शेवटच्या तीनही सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला पराभूत केले. २०१७ च्या टी २० विश्वचषक स्पर्धेत भारताने ऑस्ट्रेलियावर ३६ धावांनी विजय मिळवला. त्यानंतर २०१८ च्या टी २० विश्वचषक स्पर्धेत भारत ४८ धावांनी विजयी झाला, तर आज भारताने १७ धावांनी विजय मिळवला.

T20 WC 2020 Ind Vs Aus : पूनमच्या फिरकीपुढे ऑस्ट्रेलियाचे लोटांगण; भारताची विजयी सलामी

दरम्यान, १९.५ षटकात भारताने ऑस्ट्रेलियाला ११५ धावांत बाद केले. त्याआधी, भारताकडून दिप्ती शर्माने शेवटपर्यंत झुंज देत नाबाद ४९ धावा केल्या. तर मुंबईकर रॉड्रीग्जने ३३ चेंडूत २६ धावा केल्या. आपला पहिला टी २० विश्वचषक सामना खेळणाऱ्या शफाली वर्मानेदेखील धमाकेदार खेळी करत ५ चौकार आणि १ षटकार लगावले. पण १५ चेंडूत २९ धावा करून ती बाद झाली.