News Flash

प्रज्ञेशला उपविजेतेपद

प्रज्ञेशचा अंतिम फेरीत अमेरिकेच्या डेनिस कुडलाकडून ६-३, ३-६, ०-६ असा पराभव झाला.

(संग्रहित छायाचित्र)

 

भारताच्या प्रज्ञेश गुणेश्वरनला अमेरिकेतील कॅरी चॅलेंजर टेनिस स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. प्रज्ञेशचा अंतिम फेरीत अमेरिकेच्या डेनिस कुडलाकडून ६-३, ३-६, ०-६ असा पराभव झाला.

पहिला सेट जिंकूनही चौथ्या मानांकित प्रज्ञेशने पुढील दोन सेट गमावले. दुसऱ्या मानांकित कुडलाने पहिला सेट गमावल्यानंतर खेळ उंचावला. तिसऱ्या सेटमध्ये तर एकही गेम जिंकण्याची संधी प्रज्ञेशला मिळाली नाही. याआधी स्पर्धेत उपउपांत्यपूर्व फेरीत अमेरिकेच्या जॅक सॉकविरुद्ध आणि उपांत्यपूर्व फेरीत ब्राझीलच्या थॉमस बेल्यूकीवर प्रज्ञेशने तीन सेटमध्ये विजय मिळवला होता. सॉक हा जागतिक क्रमवारीतील अव्वल १०मधील माजी खेळाडू असल्याने प्रज्ञेशचा तो विजय विशेष होता. प्रज्ञेश मंगळवारपासून अमेरिकेतील ओरलॅँडो चॅलेंजर स्पर्धेत सहभाग घेणार आहे. त्याची सलामीला अमेरिकेच्या सॅम रिफिसशी लढत होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 17, 2020 12:09 am

Web Title: pragnesh guneshwaran was runner up in the us carrie challenger tennis championships abn 97
Next Stories
1 विराटच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेच कर्णधारपदासाठी योग्य !
2 टीम इंडियासाठी आनंदाची बातमी, कसोटी मालिकेपर्यंत इशांत शर्मा तंदुरुस्त होण्याचे संकेत
3 Video : उसळत्या चेंडूंचा सामना करण्यासाठी टीम इंडिया करतेय खास सराव
Just Now!
X