कॅरी चॅलेंजर टेनिस स्पर्धा

भारताच्या प्रज्ञेश गुणेश्वरनने अमेरिकेतील कॅरी चॅलेंजर ‘एटीपी’ टेनिस स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली. या हंगामात उपांत्य फेरी गाठण्याची प्रज्ञेशची ही जर्मनीतील स्पर्धेनंतरची दुसरी वेळ ठरली.

जागतिक क्रमवारीत १४६व्या स्थानी असणाऱ्या प्रज्ञेशची रविवारी उपांत्य फेरीत डेन्मार्कच्या मायकेल टॉर्पेगार्डशी लढत आहे. टॉर्पेगार्ड जागतिक क्रमवारीत १९८व्या स्थानी आहे.  कॅरी चॅलेंजर स्पर्धेत प्रज्ञेशने उपांत्यपूर्व फेरीत ब्राझीलच्या थॉमस बेल्यूकीवर ३-६, ७-५, ७-६ असा विजय मिळवला. प्रज्ञेशने पहिला सेट गमावूनही ही बाजी मारली.

दुसऱ्या आणि तिसऱ्या सेटमध्ये प्रज्ञेशला बऱ्यापैकी झुंज द्यावी लागली. मात्र अखेर त्याने विजय साध्य केला.

३० वर्षीय प्रज्ञेशने कारकीर्दीत अ‍ॅनिंग (चीन येथे एप्रिल २०१८ मध्ये) आणि बेंगळूरु (नोव्हेंबर २०१८) येथ झालेल्या चॅलेंजर स्पर्धाची विजेतेपदे पटकावली आहेत.