News Flash

“सचिनची विकेट काढल्यावर संघमालकाकडून मिळालं होतं गिफ्ट”

डेक्कन चार्जर्स संघाच्या गोलंदाजाने सांगितला अनुभव

भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने वानखेडे मैदानावर २०१३ साली शेवटचा सामना खेळला आणि त्यानंतर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला. हा सामना अजाणतेपणे आणखी एका खेळाडूसाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना ठरला. तो खेळाडू म्हणजे फिरकीपटू प्रग्यान ओझा. ओझाने फेब्रुवारी २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केले. त्याने २०१३ साली भारताकडून शेवटचा सामना खेळला. त्यानंतर २०१९ पर्यंत त्याने देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत आपले नशीब आजमावले, पण अखेर फेब्रुवारी महिन्यात त्याने क्रिकेटला रामराम ठोकला.

विस्डन इंडियाला त्याने नुकतीच एक मुलाखत दिली. त्या मुलाखतीत त्याने अनेक रंजक किस्से सांगितले. IPL मध्ये सचिनला बाद करण्यासाठी त्याला संघमालकाकडून गिफ्ट मिळाले होते. याबाबत प्रग्यान ओझा म्हणाला, “२००९ चं IPL आफ्रिकेत होतं. आमचा (डेक्कन चार्जर्स) सामना मुंबई इंडियन्सशी डर्बनच्या मैदानावर होणार होता. संघमालक हैदराबादचे होते आणि मला लहानपणापासून ओळखत होते. त्यामुळे त्यांना माझ्यावर विश्वास होता. त्या सामन्याआधी संघमालक माझ्याकडे आले आणि मला म्हणाले की जर तू सचिनची विकेट घेतलीस तर मी तुला खास गिफ्ट देईन.”

“त्यांना माहिती होतं की मला घड्याळं खूप आवडतात. मी त्यांना म्हटलं की मी जर सचिनची विकेट काढली, तर मला घड्याळ हवं. त्यानंतर पुढच्याच दिवशी झालेल्या सामन्यात मी सचिनला बाद केलं आणि संघमालकाकडून मला गिफ्ट मिळालं”, असेही ओझाने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 28, 2020 4:20 pm

Web Title: pragyan ojha reveals how sachin tendulkar wicket in ipl got him a special gift from his team owner vjb 91
Next Stories
1 …तेव्हा सुशांतशी बोललो नाही याची खंत – शोएब अख्तर
2 …म्हणून रोहित शर्मा एक यशस्वी कर्णधार – इरफान पठाण
3 “कर्णधार म्हणून विराट अन धोनीमध्ये आहे ‘हा’ फरक”
Just Now!
X