News Flash

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या पी. नांजप्पाला रौप्यपदक

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत शनिवारी भारताचा प्रकाश नांजप्पा रौप्यपदकाचा मानकरी ठरला. १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात १९८.२ गुणांची कमाई करत नांजप्पाने भारताला रौप्यपदक मिळवून दिले.

| July 26, 2014 05:46 am

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत शनिवारी भारताचा प्रकाश नांजप्पा रौप्यपदकाचा मानकरी ठरला. १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात १९८.२ गुणांची कमाई करत नांजप्पाने भारताला रौप्यपदक मिळवून दिले. या स्पर्धेतील भारताच्या एकूण पदकांची संख्या आता ११वर पोहचली आहे. यामध्ये तीन सुवर्ण, पाच रौप्य आणि तीन कांस्यपदकांचा समावेश आहे. पदक तालिकेत भारत सध्या पाचव्या स्थानावर आहे.
इंग्लंडने १२ सुवर्ण पदकांसह पहिल्या, ऑस्ट्रेलिया तितक्यात पदकांसह दुसऱ्या आणि स्कॉटलंड सात सुवर्ण पदकांसह तिस-या स्थानावर आहे. चौथ्या स्थानावर कॅनडा असून त्यांच्या खात्यात सात सुवर्ण पदके आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2014 5:46 am

Web Title: prakash nanjappa wins 11th medal for india at cwg
Next Stories
1 कबड्डी.. कबड्डी..
2 BLOG : इशांतचे कौतुक करायचे का?
3 अभिनवचा सुवर्णवेध
Just Now!
X