News Flash

प्रशांत, काजल यांची विजेतेपदाला गवसणी

केशव गोरे स्मारक ट्रस्ट आयोजित राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत प्रशांत मोरे आणि काजल कुमारी यांनी अपेक्षेप्रमाणे विजेतेपदाला गवसणी घातली.

(संग्रहित छायाचित्र)

राज्य मानांकन कॅरम स्पर्धा

केशव गोरे स्मारक ट्रस्ट आयोजित राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत प्रशांत मोरे आणि काजल कुमारी यांनी अपेक्षेप्रमाणे विजेतेपदाला गवसणी घातली.

पुरुष एकेरी गटात मुंबईच्या विश्वविजेत्या प्रशांतने मुंबईच्याच झैद अहमदचा २४-११, २५-५ असा सहज पराभव करत या स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. अंतिम सामन्यात प्रवेश करण्यापूर्वी प्रशांतने मुंबईच्या फाईम काझी, तर झैदने मुंबईच्याच रियाझ अकबरअलीवर विजय मिळविला होता. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत रियाझ अकबरअलीने फाइम काझीला २५-११, २५-९ असे हरविले.

महिला एकेरी गटात नेहमीप्रमाणे मुंबईच्या काजलने बाजी मारली. काजलने मुंबईच्या नीलम घोडकेला अंतिम सामन्यात २५-०, २५-१० असे सहज पराभूत केले. अंतिम फेरी गाठण्यापूर्वी काजलने मुंबईच्या मिताली पिंपळेला पराभूत केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2019 1:07 am

Web Title: prashant kajal win the carrom contest
Next Stories
1 सिद्धार्थसाठी महाराष्ट्राची संघनिवड प्रलंबित
2 तिरंदाजी संघटनेवरील बंदीची शक्यता धूसर
3 झुंजार न्यूझीलंडविरुद्ध भारताचे पारडे जड
Just Now!
X