18 February 2020

News Flash

झोप उडवणारी घटना : भारताचा आघाडीचा गोलंदाज डिप्रेशनमुळे करणार होता आत्महत्या

भारताला अनेक महत्त्वाच्या मालिका जिंकून देण्यात मोलाची कामगिरी

प्रचंड स्पर्धा. स्वतःच अस्तित्व टिकवण्याचं आव्हान आणि ते पेलताना वाट्याला येणारी घुसमट, हे आता दैनंदिन आयुष्याचा भाग बनत चाललं आहे. पण, याच स्पर्धात्मक आयुष्याला तोंड देताना अनेकांच्या आयुष्यात डिप्रेशन डोकावतं आणि ते जगाचा निरोप घेतात. बॉलिवडूमधील कलाकारांपासून ते सर्वसामान्यांपर्यंत अनेकांचे जीव डिप्रेशनमुळे गेल्याचं ऐकायला मिळत. मात्र, भारतीय क्रिकेट संघासाठी गोलंदाजी करणारा खेळाडूही डिप्रेशनच्या त्रासामुळे मरणाच्या दारावर जाऊन पोहोचला होता. हातात बंदूक होती. गोळी चालवणारं इतक्या, लहानग्या मुलाचा फोटो दिसला व त्यानं निर्णय बदलला. कधीकाळी भारतीय संघांची जमेची बाजू असलेल्या प्रवीण कुमारनं अखेर डिप्रेशनवर मौन सोडलं. त्यानंतर ही झोप उडवणारी गोष्ट समोर आली.

हवेत चेंडू स्विंग करण्याची क्षमता असलेल्या मध्यमगती गोलंदाज प्रवीण कुमारनं कामगिरीच्या बळावर भारतीय संघात स्थान मिळवलं. त्यानंतर त्याची कामगिरी खालावली आणि तो भारतीय संघाबाहेर गेला. याच काळात त्याच्या आयुष्यात डिप्रेशननं पाऊल ठेवलं आणि खेळ आणि डिप्रेशन अशा दोन आघाड्यांवर त्याची लढाई सुरू झाली. डिप्रेशनमुळे तो इतका खचला की एक दिवस थेट आत्महत्या करण्याचं त्यानं ठरवलं. पण, एका फोटोनं पुन्हा तो घरी परतला. इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत प्रवीण कुमारनं डिप्रेशनविषयीचा धक्कादायक अनुभव सांगितला.

‘त्या’ दिवशी नेमकं काय घडलं?

प्रवीण कुमारनं याविषयी बोलताना सांगितलं. जादूई फिरकीमुळे क्रिकेट चाहत्यांच्या मनात स्थान मिळवणाऱ्या प्रवीण कुमारला एकटेपणा आणि मनात निर्माण झालेल्या रितेपणानं पोखरलं होतं. काही महिन्यांपूर्वीची ही घटना आहे. मेरठमध्ये कुटुंबासोबत होतो. एक दिवस पहाटे थंडी असल्यानं मफलर गुंडाळून प्रवीणनं रिव्हॉल्वर घेतली. त्यानंतर कार घेऊन तो हरिद्वारला जाणाऱ्या महामार्गाच्या दिशेने निघून गेला. गडद अंधारात रस्त्याच्या कडेला त्यानं कार थांबवली. त्याच्या रिव्हॉल्वर होती. तो स्वतःलाच म्हणाला, क्या है ये सब? बस खतम करते है. त्याचवेळी त्याची नजर गाडीत असलेल्या फोटोवर गेली. तो फोटो होता. प्रवीण कुमारच्या गोंडस मुलाचा. खळाळत हास्य असलेला हा फोटो बघून प्रवीण कुमार थांबला. त्याला काहीतरी आतल्या आत जाणवलं. त्याच्या मनात जगण्याची उमेद जागी झाली. ‘मी हे करू शकत नाही. माझ फुलासारखं लेकरू. मी त्यांना या नरकात सोडून जाऊ शकत नाही, असं स्वतःशीच पुटपुटला आणि त्यानं परत घराचा मार्ग धरला.

 

First Published on January 19, 2020 12:32 pm

Web Title: praveen kumar on struggle of sportspersons with mental ailments attempt to suicide bmh 90
Next Stories
1 Mumbai Marathon 2020 : १७व्या मुंबई मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फुर्त प्रतिसाद
2 Ind vs Aus : आज बेंगळूरुत सत्तासंघर्ष!
3 हार्दिकसाठी निवड समितीची बैठक लांबणीवर
Just Now!
X