24 November 2017

News Flash

प्रवीण कुमारचे बंदीप्रकरणी मौन

वेगवान गोलंदाज प्रवीण कुमार मानसिकदृष्टय़ा खचला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) प्रवीणला आंतर-राज्य

पीटीआय, कानपूर | Updated: February 12, 2013 3:54 AM

वेगवान गोलंदाज प्रवीण कुमार मानसिकदृष्टय़ा खचला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) प्रवीणला आंतर-राज्य विजय हजारे करंडक सामन्यांत उत्तर प्रदेशकडून खेळण्यास बंदी घातली आहे.
‘‘या बंदीबाबत मला प्रसारमाध्यमांशी बोलायला आवडणार नाही. कारण मी अतिशय खचलो आहे. मला कृपया त्रास देऊ नका. माझे मौन हेच सर्व प्रश्नांचे उत्तर आहे,’’ असे प्रवीण कुमारने सांगितले. ‘‘मी शांतच राहणे पसंत करेन,’’ असे त्याने पुढे सांगितले. कॉर्पोरेट करंडक क्रिकेट स्पध्रेत प्रतिस्पर्धी संघाचा फलंदाज आणि पंचांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी प्रवीण कुमारला बीसीसीआयने शिक्षा केली.
शनिवारी बीसीसीआयने त्याच्यावर कारणे दाखवा नोटिस बजावली होती. मीरतचा वेगवान गोलंदाज प्रवीणचा हजारे करंडक क्रिकेट स्पध्रेसाठी उत्तर प्रदेशच्या १५ खेळाडूंच्या चमूत समावेश करण्यात आला होता.

First Published on February 12, 2013 3:54 am

Web Title: pravin kumar has no comments on ban