मुंबई : लवकरच आई-बाबा होणाऱ्या अनुष्का शर्मा आणि विराट कोहली या जोडीने योगाचे महत्त्व ‘शीर्षांसन’करून पटवून दिले आहे. अनुष्काने समाजमाध्यमावर तिचे काही दिवसांपूर्वीचे छायाचित्र प्रसिद्ध केले. त्यात अनुष्का ही विराटच्या साथीने डोके खाली आणि पाय वर म्हणजेच शीर्षांसनाचा प्रकार करत असल्याचे दिसले आहे. ‘‘माझ्या आयुष्यात योगाचे महत्त्व सर्वोच्च आहे. त्यातच शीर्षांसन हा प्रकार मी नेहमीच माझे योगा शिक्षक इफा श्रॉफ यांच्या उपस्थितीत करत आले आहे. आता गरोदरपणाच्या काळातही शीर्षांसन करून स्वत:ची तब्येत चांगली ठेवण्याचा माझा प्रयत्न आहे. गरोदरपणाच्या आधी जी योगासने करत होतीस, ती गरोदर राहिल्यावरही कर, असा सल्ला मला डॉक्टरांनी दिला आहे,’’ असे अनुष्काने समाजमाध्यमावर छायाचित्र प्रसिद्ध करताना म्हटले.