भारताच्या कुमारवेलू प्रेमकुमारने आशियाई इन्डोअर अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेतील लांब उडीत रौप्य पदक पटकावले.
प्रेमकुमारने शेवटच्या प्रयत्नात ७.९२ मीटपर्यंत उडी मारली. भारताचा आणखी एक खेळाडू अंकित शर्माने ७.६६ मीटपर्यंत उडी मारली. मात्र त्याने चार वेळा फाउल करीत पदकाची संधी वाया घालवली. चीनच्या झांग याओगुआंगने ७.९९ मीटर अंतर पार केले आणि सोनेरी कामगिरी केली. ओमप्रकाशसिंग कऱ्हानाने गोळाफेकीत कांस्य पदकाची कमाई केली. त्याने १८.७७ मीटपर्यंत गोळाफेक केली. त्याने अन्य चार प्रयत्नांत फाउल्स केले.
भारताने या स्पर्धेत एक सुवर्ण, तीन रौप्य व तीन कांस्य अशी एकूण सात पदके जिंकली.

पुढील आशियाई मैदानी स्पर्धा रांचीला 
भारताला २०१७ ची आशियाई मैदानी (आऊटडोअर) स्पर्धा आयोजित करण्याचा मान मिळाला आहे. ही स्पर्धा रांची येथे होणार आहे.