राष्ट्रीय विक्रमवीर प्रेमकुमार कुमारावेलने लागोपाठ दोन आठवडय़ांत आठ मीटरपेक्षा जास्त लांब उडी मारून अमेरिकेत सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय मैदानी स्पर्धाच्या मालिकेत लक्षणीय कामगिरी केली.
प्रेमने आयर्विन येथे झालेल्या स्पर्धेत ८.०१ मीटपर्यंत उडी मारली. प्रेमकुमार या २१ वर्षीय खेळाडूचे नावावर ८.०९ मीटर हा राष्ट्रीय विक्रम आहे. त्याने या मोसमात कॅलिफोर्निया विद्यापीठात झालेल्या स्पर्धेत ८.०१ मीटर अशी कामगिरी केली होती. त्याने नुकत्याच झालेल्या फेडरेशन स्पर्धेत भाग घेतला नव्हता. त्याने कॅलिफोर्निया विद्यापीठात दुसरे स्थान मिळविले. टेड हूपर याने सुवर्णपदक मिळविले. जूनमध्ये आशियाई मैदानी स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करण्याचे प्रेमकुमारचे ध्येय आहे.