News Flash

प्रीमियर बॅडमिंटन लीग : बॅडमिंटन लीगमधून श्रीकांतचीही माघार

गुंटूरच्या २६ वर्षीय श्रीकांत गेल्या हंगामात बंगळुरू रॅप्टर्सचे प्रतिनिधित्व करताना संघाला पहिलेवहिले ‘पीबीएल’ जेतेपद मिळवून दिले होते.

(संग्रहित छायाचित्र)

भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांतने सोमवारी प्रीमियर बॅडमिंटन लीगमधून (पीबीएल) माघार घेत असल्याचे स्पष्ट केले. २०२०च्या टोक्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या पाश्र्वभूमीवर आंतरराष्ट्रीय स्पर्धाकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी हा निर्णय घेत असल्याचे श्रीकांतने सांगितले.

गुंटूरच्या २६ वर्षीय श्रीकांत गेल्या हंगामात बंगळुरू रॅप्टर्सचे प्रतिनिधित्व करताना संघाला पहिलेवहिले ‘पीबीएल’ जेतेपद मिळवून दिले होते. परंतु २० जानेवारी ते ९ फेब्रुवारी, २०२० या कालावधीत होणाऱ्या पाचव्या ‘पीबीएल’ हंगामात तो सहभागी होणार नाही. ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या सायना नेहवालनेही यंदा लीगमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. ‘‘आगामी स्पर्धात्मक कार्यक्रम खडतर आहे. हे आव्हान आणि अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी हा निर्णय मी घेत आहे. येत्या हंगामात कामगिरी अधिक उंचावण्यासाठी प्रयत्नशील असेन,’’ असे श्रीकांतने ‘ट्विटर’वर म्हटले आहे.

२०१७ मध्ये चार विजेतेपदे जिंकणारा श्रीकांत त्यानंतर अनेक स्पर्धामध्ये झगडतानाच आढळत आहे. वर्षांच्या पूर्वार्धात त्याने इंडिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. लय आणि तंदुरुस्ती यामुळे श्रीकांतचे जागतिक क्रमवारीतील स्थान ११पर्यंत खालावले आहे. महिन्याच्या पूर्वार्धात हाँगकाँग खुल्या स्पर्धेच्या उपांत्य फेरीपर्यंत त्याने मजल मारली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 26, 2019 2:29 am

Web Title: premier badminton league akp 94
Next Stories
1 न्यूझीलंडचा इंग्लंडवर दणदणीत विजय
2  डेव्हिस चषक टेनिस स्पर्धा : स्पेनची सहाव्या विजेतेपदावर मोहोर
3 चेंडूची पकड बदलल्यामुळे कामगिरी उंचावली -उमेश
Just Now!
X