04 June 2020

News Flash

इंग्लिश प्रीमियर फुटबॉल लीग : ब्रायटनने चेल्सीला बरोबरीत रोखले

विशेष म्हणजे चौथ्या क्रमांकावर असणारा चेल्सी ब्रायटनला सहज नमवेल असे अपेक्षित होते

अलिरेझा जहानबक्ष

लंडन : इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये नवीन वर्षांच्या पहिल्या दिवशी झालेल्या रोमहर्षक लढतीत ब्रायटनने बलाढय़ चेल्सीला १-१ बरोबरीत रोखले. विशेष म्हणजे चौथ्या क्रमांकावर असणारा चेल्सी ब्रायटनला सहज नमवेल असे अपेक्षित होते. त्याप्रमाणे १०व्या मिनिटालाच सेझार अ‍ॅझपिलिक्यूटाने गोल करत चेल्सीला १-० आघाडी मिळवून दिली. चेल्सीकडून आणखी गोल होतील अशीच अपेक्षा होती. चेल्सीला गोल करण्याच्या काही संधीदेखील होत्या, मात्र ब्रायटनच्या बचावपटूंनी चेल्सीला रोखण्यात यश मिळवले.

अखेर खेळ संपायला सहा मिनिटे बाकी असताना ब्रायटनच्या अलिरेझा जहानबक्षने (८४वे मिनिट) गोल केला. त्यामुळेच ब्रायटनला चेल्सीला बरोबरीत रोखण्यात यश आले.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 2, 2020 2:46 am

Web Title: premier league brighton chelsea match draw zws 70
Next Stories
1 ब्रिस्बेन खुली टेनिस स्पर्धा : व्हिनस विल्यम्सची माघार
2 टीकाकारांकडे दुर्लक्ष; फक्त खेळाकडे लक्ष!
3 एफआयएच प्रो हॉकी लीग : ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याची क्षमता!
Just Now!
X