भारतीय महिला फुटबॉल संघाने ऑलिम्पिक पात्रतेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. म्यानमार येथे झालेल्या पहिल्या फेरीतील अखेरच्या सामन्यात भारतीय संघाला १-२ अशा फरकाने म्यानमारकडून पराभूत व्हावे लागले. पण स्पर्धेतील इतर सामन्यातील कामगिरीच्या बळावर भारताला पात्रतेच्या दुसऱ्या फेरीत स्थान मिळाले. भारताने प्रथमच अशी ऐतिहासिक भरारी घेतली आहे. भारताने ‘C’ गटात दुसरे स्थान पटकावत पात्रतेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश निश्चित केला.

भारताने पहिल्या सामन्यात बांगलादेशचा ७-१ असा पराभव केला होता. पण नेपाळविरुद्ध सामन्यात भारतीय महिला संघाला १-१ अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले. म्यानमारविरुद्धच्या सामन्यात भारताने एकच गोल केला. २३व्या मिनिटाला रतनबाला देवीने हा गोल केला. मात्र, म्यानमारच्या वीन थेइंगीने बरोबरीचा गोल केला. त्यानंतर म्यानमारकडून आणखी एक गोल झाला. त्यामुळे भारताला तो सामना गमवावा लागला. पण असे असले तरी विजयी सामन्यात भारत ६ गोळीने जिंकला असल्याने भारताला दुसऱ्या फेरीत स्थान मिळाले.

दुसऱ्या फेरीचे सामने पुढील वर्षी एप्रिल महिन्यात खेळवण्यात येणार आहेत.