18 September 2020

News Flash

‘गौरव’ महाराष्ट्राचा!

डोंगरदऱ्यातून, घाटातल्या अवघड वळणांमधून, पावसाच्या सरी झेलत आणि कारवर अचूक नियंत्रण साधत महिंद्रा अ‍ॅडव्हेन्चरच्या गौरव गिल याने दिलेला शब्द खरा ठरवला आणि ‘स्टार ऑफ नाशिक’

| June 10, 2013 03:09 am

डोंगरदऱ्यातून, घाटातल्या अवघड वळणांमधून, पावसाच्या सरी झेलत आणि कारवर अचूक नियंत्रण साधत महिंद्रा अ‍ॅडव्हेन्चरच्या गौरव गिल याने दिलेला शब्द खरा ठरवला आणि ‘स्टार ऑफ नाशिक’ पुरस्काराचा किताब पटकावला. ‘रॅली ऑफ महाराष्ट्र’ शर्यतीत सर्वोत्तम वेगवान ड्रायव्हर होण्याचा मान पटकावणारा गौरव हा महाराष्ट्राची शान ठरला.
वेस्टर्न इंडिया स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे (विसा) आयोजित केलेल्या इंडियन नॅशनल अजिंक्यपद शर्यतीत गौरवने एक तास २६ मिनिटे आणि २९ सेकंद अशा वेळेसह सर्वसाधारण जेतेपद पटकावले. पेट्रोल असो वा डिझेल, जास्त क्षमतेची असो वा कमी क्षमतेची, हलकी असो वा वजनाने जड. कोणतीही कार मला द्या, जेतेपद मीच पटकावेन, हे शर्यतीआधीचे शब्द त्याने खरे करून दाखवले.
 ‘‘जेतेपद पटकावून स्पर्धेत आघाडीवर आल्याचा आनंद होत आहे. शर्यतीदरम्यानचा मार्ग फारच अवघड होता. चाहत्यांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असल्यामुळे कार वेगाने पळवताना सुखद वाटत होते. आता उर्वरित तीन फे ऱ्यांकडे माझे लक्ष लागले आहे,’’ असे गौरवने जेतेपदानंतर सांगितले.
रविवारी झालेल्या तीन फेऱ्यांमध्ये गौरवला चांगली कामगिरी करता आली नसली तरी त्याआधी सात फेऱ्यांमध्ये केलेल्या सुरेख कामगिरीवर गौरवने नाशिक रॅलीचे जेतेपद खेचून आणले. गौरवला करमजीत सिंग आणि अमित रजीत सिंग यांनी कडवी लढत दिली. करमजीतने एक तास २७ मिनिटे आणि ४० सेकंद अशी वेळ नोंदवत सर्वसाधारण गटात दुसऱ्या स्थानावर मजल मारली. अमितने १ तास २८ मिनिटे १६ सेकंदासह तिसरे स्थान पटकावले. आता या शर्यतीत ३९ गुणांची कमाई करून गौरवने स्पर्धेत अव्वल स्थानी कूच केली आहे. १६०० सीसी गटात, अर्जुन राव अरूर याने १ तास ३१ मिनिटे १ सेकंद अशी कामगिरी करत जेतेपद संपादन केले. जेआयएनआरसी गटात, असाद खान याने १ तास ३६ मिनिटे १२ सेकंद अशी वेळ देत जेतेपदावर मोहोर उमटवली. आयआरसी गटात करमजीत तर आयएनआरसी गटात अमित यांनी बाजी मारली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2013 3:09 am

Web Title: pride of maharashtra
टॅग Sports
Next Stories
1 श्रीकांत अजिंक्य
2 राजस्थान रॉयल्स आणि राज कुंद्रा यांचे भवितव्य अधांतरी
3 जगातील सर्वोत्तम बुद्धिबळपटू व्हायचंय!
Just Now!
X