News Flash

आयपीएल २०२१पूर्वी दोन मुंबईकर क्रिकेटपटूंचा ‘खास’ व्हिडिओ होतोय व्हायरल!

यापैकी एका क्रिकेटपटूने आयपीएलमध्ये घातला होता धुमाकूळ

सराव करताना श्रेयस अय्यर आणि पृथ्वी शॉ

भारतीय क्रिकेट संघाचे स्टार खेळाडू श्रेयस अय्यर आणि पृथ्वी शॉ अलीकडेच एकत्र प्रशिक्षण घेताना दिसून आले. टीम इंडिया, दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबईसाठी एकत्र खेळलेले दोन्ही खेळाडू एकमेकांचे चांगले मित्र आहेत. अलीकडेच पुढे ढकलण्यात आलेल्या आयपीएल २०२१मध्ये पृथ्वी शॉ चांगल्याच फॉ़र्मात होता. तर खांद्याच्या दुखापतीमुळे श्रेयस अय्यर हंगामाच्या पहिल्या टप्प्यात खेळू शकला नाही.

आयपीएल २०२१चे उर्वरित सामने सप्टेंबरमध्ये संयुक्त अरब अमिरातीमध्ये होणार आहेत. शॉ आणि अय्यर दोघेही या स्पर्धेसाठी दिल्ली कॅपिटल्स संघात सहभागी होतील. मात्र, याआधी मर्यादित षटकांच्या मालिकेत भारतीय संघाला श्रीलंकेत जावे लागणार आहे. या दौऱ्यासाठी शॉ आणि अय्यर मैदानात सराव करत आहेत.

हेही वाचा – आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निलंबित झालेल्या खेळाडूसाठी चक्क पंतप्रधानांचा पुढाकार!

आयपीएल २०२१पूर्वी भारतीय संघ तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यासाठी श्रीलंकेचा दौरा करेल. श्रेयस अय्यर श्रीलंकेच्या दौऱ्यावर पुनरागमनासाठी उत्सुक असेल. जर तो पूर्णपणे तंदुरुस्त असेल, तर कदाचित टीम इंडियाचे कर्णधारपद त्याला मिळू शकते. प्रथमच दोन भारतीय संघ वेगवेगळ्या देशांमध्ये एकाच वेळी खेळतील. वरिष्ठ संघाचे अनेक खेळाडू कसोटी मालिकेसाठी इंग्लंडला गेले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 8, 2021 10:19 am

Web Title: prithvi shaw and shreyas iyers training video goes viral adn 96
Next Stories
1 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निलंबित झालेल्या खेळाडूसाठी चक्क पंतप्रधानांचा पुढाकार!
2 मेस्सीला हरवण्यात अनेकजण अपयशी ठरले, पण एका भारतीयाने त्याला मागे टाकले!
3 जोकोव्हिचचा झंझावात!
Just Now!
X