20 October 2020

News Flash

भारताच्या सिनिअर संघाकडून खेळण्याची हीच ती वेळ – पृथ्वी शॉ

पृथ्वीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ विश्वविजेता

पृथ्वी शॉ (संग्रहीत छायाचित्र)

न्यूझीलंडमध्ये पार पडलेल्या १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला विजेतेपद मिळवून देणारा पृथ्वी शॉ सध्या चांगलाच चर्चेत आहे. स्थानिक सामन्यांमध्ये घातलेला धावांचा रतीब आणि विश्वचषकात भारतीय संघाचं नेतृत्व करुन मिळवलेलं विजेतेपद यामुळे आयपीएलमध्ये पृथ्वीवर चांगल्या रकमेची बोली लागली आहे. पण या सर्व गोष्टींनंतर पृथ्वी भारताच्या सिनिअर संघाकडून खेळण्यासाठी तयार आहे. खुद्द पृथ्वीनेच याची कबुली दिली आहे. भारताच्या सिनिअर संघात मिळणाऱ्या संधीबद्दल विचारलं असता पृथ्वी म्हणाला, “हो, आता मला संघात जागा मिळण्यास काहीच हरकत नाही. फक्त यासाठी मला कामगिरीत सातत्य राखून सतत धावा काढणं गरजेचं आहे. मिळालेल्या प्रत्येक संधीचं सोनं केल्यासं मलाही सिनिअर संघात लवकरच जागा मिळेलं.”

मुंबईकडून रणजी क्रिकेट आणि दुलीप करंडकात पृथ्वीने केलेली कामगिरी पाहून १९ वर्षाखालील विश्वचषकासाठी संघाचं नेतृत्व पृथ्वीला देण्यात आलं. यानंतर मोहम्मद कैफ, विराट कोहली आणि उन्मुक्त चंद यांच्यानंतर भारताला विश्वचषक मिळवून देणारा पृथ्वी भारताचा चौथा कर्णधार ठरला आहे.

अवश्य वाचा – द्रविडगिरीला सलाम!

भारतीय सिनिअर संघाच्या निवड समितीचे प्रमुख एम. एस. के. प्रसाद यांनीही पृथ्वीच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केलं आहे. “निवड समिती पृथ्वी आणि त्याच्या संघातील इतर सदस्यांच्या कामगिरीवर लक्ष ठेवून आहे. सिनिअर संघाकडून आणि भारत अ संघाकडून सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या प्रत्येक खेळाडूला योग्य वेळी संघात जागा मिळेलं”, असंही प्रसाद यांनी म्हटलं आहे. सध्या पृथ्वी शॉ विजय हजारे चषकात मुंबईकडून खेळतो आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2018 11:38 am

Web Title: prithvi shaw believes he is ready to play from indian senior side
टॅग Bcci,Prithvi Shaw
Next Stories
1 महाराष्ट्राच्या संघांची विजयी सलामी
2 भारताचे लक्ष्य.. ऐतिहासिक विजय आणि अग्रस्थान!
3 गांगुलीनं सचिन तेंडुलकरशी केली विराट कोहलीची तुलना
Just Now!
X