20 January 2021

News Flash

पृथ्वी शॉ दुखापतग्रस्त, महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडला भारत अ संघात स्थान

११ जुलैपासून भारताच्या विंडीज दौऱ्याला सुरुवात

मुंबईचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉला पुन्हा एकदा दुखापतीमुळे आपलं स्थान गमवावं लागलं आहे. भारत अ संघाच्या वेस्ट इंडिज दौऱ्यात पृथ्वी शॉला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली आहे. पृथ्वी शॉच्या जागेवर महाराष्ट्राचा आक्रमक फलंदाज ऋतुराज गायकवाडला भारत अ संघात स्थान देण्यात आलं आहे. ११ जुलै पासून भारत अ संघाच्या वेस्ट इंडिज दौऱ्याला सुरुवात होणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ ५ वन-डे सामन्यांची मालिका खेळणार आहे.

वन-डे मालिकेसाठी सुधारित भारत अ संघ –

मनिष पांडे (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, अनमोलप्रीत सिंह, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, इशान किशन (यष्टीरक्षक), राहुल चहर, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कृणाल पांड्या, दिपक चहर, खलिल अहमद, आवेश खान, नवदीप सैनी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2019 2:20 pm

Web Title: prithvi shaw out of india a series against west indies ruturaj gaikwad gets chance psd 91
Next Stories
1 विश्वचषकात धोनी फलंदाजीतच नव्हे, यष्टीमागेही अपयशी
2 रायुडूला सावत्र असल्यासारखी वागणूक दिली, संदीप पाटील यांचा संताप
3 World Cup 2019: जखमी अवस्थेतही धोनी मैदानात लढत होता, रक्त थुंकतानाचा फोटो व्हायरल
Just Now!
X