News Flash

ये भाई लोग जैसा कोई हार्ड नही है, पृथ्वी शॉ कडून विराट-धोनीचं कौतुक

पृथ्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमनाच्या प्रतिक्षेत

टीम इंडियाचा युवा कसोटीपटू पृथ्वी शॉने आपला कर्णधार विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनीचं कौतुक केलं आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ‘गली बॉय’ चित्रपटातील डायलॉगचा वापर करत पृथ्वीने, ये भाई लोग जैसा कोई हार्ड नही है असं म्हणत आपल्या सिनीअर खेळाडूंना मान दिला आहे. विश्वचषकासाठी भारतीय संघाच्या नव्या जर्सीचं काल अनावरण झालं. या सोहळ्याला धोनी, कोहली, अजिंक्य रहाणे आणि पृथ्वी शॉ हजर होते. यावेळी पृथ्वीने विराट-धोनी सोबतचा फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सराव सामन्यात दुखापतग्रस्त झालेल्या पृथ्वी शॉने नुकतच सय्यद मुश्ताक अली स्पर्धेद्वारे पुनरागमन केलं. गोव्याविरुद्ध सामन्यात पृथ्वीने धडाकेबाज अर्धशतकही झळकावलं. त्यामुळे पृथ्वी शॉ आता भारतीय संघात कधी पुनरागमन करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

अवश्य वाचा – टीम इंडिया नवीन रुपात मैदानावर येणार, पाहा नव्या जर्सीचे फोटो…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 2, 2019 4:24 pm

Web Title: prithvi shaw relishes ms dhoni virat kohlis company praise them on twitter
Next Stories
1 अभिनंदन यांच्या घरवापसीवर सचिनचा खास संदेश
2 विश्वचषकात धोनीचं संघात असणं विराटसाठी फायद्याचं – सुनील गावसकर
3 केदार जाधव-धोनीच्या खेळापुढे कांगारु बेजार, भारत 6 गडी राखून विजयी
Just Now!
X