06 August 2020

News Flash

रद्द होऊनही विम्बल्डनकडून बक्षिसाची रक्कम

पात्रता स्पर्धेत सहभागी होणाऱ्या २२४ खेळाडूंना १२,५०० पौंड मिळणार

संग्रहित छायाचित्र

 

विम्बल्डन खुली टेनिस स्पर्धा या वर्षी करोनामुळे रद्द झाली असली तरी सहभागी ६२० खेळाडूंना बक्षिसाची रक्कम देण्यात येणार आहे. विमा कंपनीसोबत चर्चा झाल्यावर विम्बल्डनच्या आयोजकांनी हा निर्णय घेतला आहे.

मुख्य स्पर्धेत खेळणाऱ्या २५६ खेळाडूंना प्रत्येकी २५ हजार पौंड मिळणार आहेत. पात्रता स्पर्धेत सहभागी होणाऱ्या २२४ खेळाडूंना १२,५०० पौंड मिळणार आहेत. ‘‘विम्बल्डन रद्द होण्याचा निर्णय झाला तेव्हापासूनच या स्पर्धेची प्रतिष्ठा वाढवणाऱ्या खेळाडूंसाठी काय करता येईल, याचा आम्ही सतत विचार करत होतो. करोनामुळे खेळाडूही आर्थिक संकटात आहेत, हा विचार आम्ही केला, ’’ असे ऑल इंग्लंड क्लबचे मुख्य कार्यकारी अधिकारी रिचर्ड लुइस यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2020 12:33 am

Web Title: prize money from wimbledon despite cancellation abn 97
Next Stories
1 हॉकी अध्यक्षांचा राजीनामा
2 रोनाल्डो, मेसी आमने-सामने?
3 महिला क्रिकेट संघ दडपण हाताळण्यात अपयशी – हेमलता
Just Now!
X