09 March 2021

News Flash

क्रीडा पुरस्कारांच्या रकमेत वाढ?

‘खेलरत्न’साठी २५ लाख आणि ‘अर्जुन’साठी १५ लाख रुपयांचे बक्षीस अपेक्षित

| August 21, 2020 01:20 am

‘खेलरत्न’साठी २५ लाख आणि ‘अर्जुन’साठी १५ लाख रुपयांचे बक्षीस अपेक्षित

नवी दिल्ली : राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराच्या बक्षीस रकमेत घसघशीत वाढ करण्याचे संकेत क्रीडा मंत्रालयाकडून देण्यात आले आहेत. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार विजेत्याला २५ लाख रुपये आणि अर्जुन पुरस्कार विजेत्याला १५ लाख रुपयांचे बक्षीस यापुढे देण्याचा विचार क्रीडा मंत्रालय करत आहे. अर्थातच याबाबत अधिकृत घोषणा क्रीडा मंत्रालयाने केलेली नाही.

सध्या खेलरत्न पुरस्कार विजेत्याला साडेसात लाख रुपये आणि अर्जुन पुरस्कार विजेत्याला पाच लाखांचे बक्षीस क्रीडा मंत्रालयाकडून देण्यात येते. जर हा प्रस्ताव मान्य झाला तर या वर्षीपासूनच वाढीव बक्षीस रक्कम पुरस्कारप्राप्त खेळाडूंना देण्यात येणार असल्याचे समजते. महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनी म्हणजेच २९ ऑगस्टला राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचे वितरण होते. मात्र यंदा करोनामुळे ऑनलाइन पद्धतीने कार्यक्रमाचे आयोजन अपेक्षित आहे. ‘‘खेळाडूंनी पुरस्काराची रक्कम कमी असल्याची तक्रार सातत्याने केली आहे. हा सर्व विचार करून बक्षीस रकमेत वाढ करण्यावर लवकरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. जर वाढीव बक्षीस रकमेचा प्रस्ताव मान्य झाला तर या वर्षीपासूनच पुरस्कारप्राप्त खेळाडूंना त्याचा फायदा होईल,’’ असे क्रीडा मंत्रालयातील पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

क्रीडा सचिव रवी मित्तल यांनी मात्र याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. ‘‘मला पुरस्कार बक्षीस रक्कम वाढीसंदर्भात कोणतीही माहिती नाही,’’ अशी प्रतिक्रिया मित्तल यांनी दिली. द्रोणाचार्य आणि ध्यानचंद पुरस्कार विजेत्यांच्या रकमेतही वाढ करून ती १० लाख रुपये करण्यात येण्याचाही विचार आहे. राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांसाठी यंदा एकूण ६२ जणांची शिफारस करण्यात आली.

पुरस्कारांची प्रतिष्ठा जपण्याची गरज – सुशील

दोनवेळा ऑलिम्पिक पदक जिंकणारा कुस्तीपटू सुशील कुमारने राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराची प्रतिष्ठा जपण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे. ‘‘मी ज्या खेळाडूंची पुरस्कारासाठी शिफारस झाली आहे त्यांचे अभिनंदन करतो. मात्र त्याचवेळेला या पुरस्काराची प्रतिष्ठा जपण्याची गरज आहे कारण यंदा अनेकांची मोठय़ा संख्येने शिफारस करण्यात आली आहे. हे पुरस्कार नियमित संख्येने देण्यात यावेत जेणेकरून या पुरस्कारांची प्रतिष्ठा कायम राहील,’’ असे सुशील कुमारने मत मांडले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 21, 2020 1:20 am

Web Title: prize money of national sports awards set to be increased zws 70
Next Stories
1 चॅम्पियन्स लीग फुटबॉल : लिऑनला नमवत बायर्न म्युनिक अंतिम फेरीत
2 “…पण ‘ती’ गोष्ट धोनीला शेवटपर्यंत जमलीच नाही”
3 IPL 2020 साठी रवाना झालेल्या खेळाडूंना BCCIची ‘वॉर्निंग’
Just Now!
X