24 October 2020

News Flash

Pro Kabaddi 2018 : ‘कॅप्टन कूल’ धोनी कबड्डीच्या मैदानात

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील टी२० मालिकेसाठी धोनीला वगळण्यात आले आहे

धोनी कबड्डीच्या मैदानात

टीम इंडियाच्या आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील टी२० मालिकेसाठी वगळण्यात आलेला कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी सध्या काही विरंगुळ्याचे क्षण घालवताना दिसत आहे. क्रिकेटच्या मैदानापासून जरी धोनी दूर असला तरी तो खेळापासून दूर राहात नाही, हे अनेकदा पाहायला मिळालेलं आहे. एखाद्या मालिकेसाठी जर धोनीला संधी मिळाली नाही किंवा विश्रांती देण्यात आली, तर तो आपली मुलगी आणि पत्नी यांच्यासोबत वेळ घालवतोच. पण याशिवाय, क्रिकेट वगळता इतर खेळांप्रति असलेले त्याचे प्रेम या कालावधीत अधिक दिसून येते.

धोनीचे फुटबॉल या खेळावरील प्रेम हे तर साऱ्यांनाच माहिती आहे. पण मंगळवारी धोनी चक्क कबड्डीच्या मैदानात दिसला.

मात्र धोनी कोणत्याही सामन्यात सहभागी होण्यासाठी मैदानात नव्हता. एका जाहिरातीच्या चित्रीकरणासाठी धोनी मुंबईतील प्रो कबड्डीच्या मैदानात दिसला. या संबंधीची माहिती सोशल मीडियावरून देण्यात आली आहे.

जाहिरातीच्या चित्रीकरणासाठी धोनी मुंबईतील प्रो कबडीच्या मैदानात

दरम्यान, माजी कर्णधार एम.एस. धोनीला टी-२० मालिकेतून वगळण्यात माझा हात नव्हता. त्याला वगळण्याबद्दल मला काही माहिती नव्हते. हा सर्वस्वी निर्णय निवड समितीचा होता, असा खुलासा भारताचा कर्णधार विराट कोहलीने विडिंजबरोबरच्या मालिका विजयानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत तो केला. धोनीला विडिंज आणि ऑस्ट्रेलियाविरोधातील टी-२० मालिकेतून वगळल्यानंतर क्रीडा विश्वामध्ये आश्चर्य व्यक्त केले गेले होते. त्यानंतर धोनीच्या चाहत्यांनी निवड समिती आणि विराट कोहलीवर नाराजी व्यक्त करत सडकून टीका केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 13, 2018 6:35 pm

Web Title: pro kabaddi 2018 former indian captain ms dhoni
टॅग Ms Dhoni
Next Stories
1 परिवारासाठी इंजिनीअर बनण्याच्या स्वप्नांना मुरड घातली – दिपक निवास हुडा
2 भावाच्या पाठबळामुळेच कबड्डीवर पुन्हा पकड!
3 Pro Kabaddi Season 6 : घरच्या मैदानावर यू मुम्बाचा दुसरा पराभव, हरयाणाची बाजी
Just Now!
X