28 January 2020

News Flash

Pro Kabaddi, Season-6 : गतविजेता पटणा पहिल्याच सामन्यात पराभूत; तामिळकडून ४२-२६ ने पराभव

प्रो-कबड्डीचा सहावा सिझन रविवार (दि.७) पासून सुरु झाला असून या सिझनचा पहिला सामना तामिळ थलायवाज विरुद्ध पटणा पायरेट्स यांच्यामध्ये होत आहे. चेन्नईच्या जवाहरलाल नेहरु इनडोअर

प्रो-कबड्डीचा सहावा सिझन रविवार (दि.७) पासून सुरु झाला असून या सिझनचा पहिला सामना तामिळ थलायवाज विरुद्ध पटणा पायरेट्स यांच्यामध्ये होत आहे. चेन्नईच्या जवाहरलाल नेहरु इनडोअर स्टेडिअममध्ये हे दोन्ही संघ एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. मागच्या सिझनचा विजेता संघ असल्याने या सामन्यामध्ये पटणा पायरेट्सला तगडा संघ मानला जात आहे. दरम्यान, आपल्या घरच्या मैदानावर खेळणाऱ्या तामिळ थलायवाजच्या संघाने शानदार खेळ करीत प्रेक्षकांची मने जिंकत पटणाच्या संघाचा ४२-२६ ने धुव्वा उडवला.

तामिळ थलायवाजचा संघ :

चढाईपटू – अजय ठाकूर, सुकेश हेगडे, जसवीर सिंह, अथुल एम. एस., सुरजीत सिंह, अनिल कुमार, के. जयेशन, अभिनंदन चंदेल, आनंद.

बचावपटू – अमित हुडा, सी. अरुण, सुनील, जाए. मीन. ली, दर्शन जे., डी. गोपू.

अष्टपैलू – मनजीत छिल्लर, डी. प्रताप, चॅन सीक पार्क, विमल राज व्ही.

पटणा पायरेट्सचा संघ :

चढाईपटू – प्रदीप नरवाल, दिपक नरवाल, सुरेंद्र सिंह, तुषार पाटील, विकास जगलान, मनजीत.

बचावपटू – जयदीप, मनिष, विकास काळे, रविंद्र कुमार, विजय कुमार.

अष्टपैलू – जवाहर डागर, अरविंद कुमार, प्रविण बिरवाल, विजय, ताएदेओक एओम, कुलदीप सिंह, ह्युनिल पार्क

First Published on October 7, 2018 8:27 pm

Web Title: pro kabaddi 2018 tamil thalaivas vs patna pirates
Next Stories
1 सहाव्या पर्वाला आजपासून चेन्नईमध्ये प्रारंभ
2 यू मुंबाने नाकारल्याचे अनुप कुमारला शल्य
Just Now!
X