गुजरात फॉच्र्युनजायंट्सची प्रो कबड्डी लीगमधील सलग सहा पराभवांची मालिका शुक्रवारी खंडित झाली. गुजरातने बलाढय़ पाटणा पायरेट्सचा २९-२६ असा पराभव केला.

जवाहरलाल नेहरू इनडोअर स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात रोहित गुलिया (१० गुण) गुजरातच्या विजयाचा शिल्पकार ठरला. जी. बी. मोरेने सहा गुण मिळवून त्याला छान साथ दिली. पाटण्याकडून प्रदीप नरवालने चढायांचे नऊ गुण मिळवून सामना वाचवण्यासाठी झुंजार प्रयत्न केले. पाटण्याचा हा १० सामन्यांपैकी सातवा पराभव ठरला.

दुसऱ्या सामन्यात यू मुंबाने तमिळ थलायव्हाजचा २९-२४ असा पराभव केला. यू मुंबाकडून अतुल एमएसने चढायांचे ७ गुण मिळवले, तर संदीप नरवालने अष्टपैलू चमक दाखवताना ५ गुणांची कमाई केली. तमिळ थलायव्हाजकडून राहुल चौधरीने चढायांचे ६ गुण आणि व्ही. अजित कुमारने ५ गुण मिळवले.

आजचे सामने

  • दबंग दिल्ली वि. बेंगळूरु बुल्स
  • जयपूर पिंक पँथर्स वि. तेलुगू टायटन्स

वेळ : सायंकाळी ७.३० वा.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स फर्स्ट, स्टार स्पोर्ट्स २, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी, स्टार स्पोर्ट्स १ मराठी.