प्रो-कबड्डीच्या सातव्या हंगामात दबंग दिल्ली आणि बंगाल वॉरियर्स यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे. उपांत्य फेरीत दिल्लीने गतविजेत्या बंगळुरुवर तर बंगालने यू मुम्बाला पराभवाचं पाणी पाजलं. दिल्ली आणि बंगालची अंतिम फेरी गाठण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. त्यामुळे सातव्या पर्वात प्रो-कबड़्डीला नवीन विजेता मिळणार हे स्पष्ट झालंय. दबंग दिल्लीचा युवा चढाईपटू नवीन कुमार हा संघासाठी हुकुमाचा एक्का ठरतोय. यंदाच्या हंगामात साखळी सामन्यापासून दिल्लीला गुणतालिकेत आघाडीवर ठेवण्यात नवीनचा महत्वाचा वाटा आहे. यादरम्यान नवीन कुमारने पाटणा पायरेट्सचा अनुभवी चढाईपटू प्रदीप नरवालचा विक्रमही मोडीत काढला आहे.

११ ऑक्टोबर रोजी झालेल्या आपल्या अखेरच्या साखळी सामन्यात यू मुम्बाने दबंग दिल्लीला ३७-३७ अशा बरोबरीत रोखलं. या सामन्यात नवीनने चढाईत १९ गुणांची कमाई करत सातव्या हंगामात २० व्या ‘Super 10’ ची नोंद केली. यानंतर बंगळुरु बुल्सविरुद्धच्या पहिल्या उपांत्य सामन्यातही नवीनने चढाईत १५ गुण कमावले.

CSK vs KKR Highlights Cricket Score in Marathi
IPL 2024 CSK vs KKR Highlights: ऋतुराजच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर सीएसकेचा शानदार विजय, केकेआरवर ७ विकेट्सनी केली मात
IPL Match 2024 Chennai Super Kings vs Sunrisers Hyderabad sport news
Ipl 2024, CSK vs SRH: चेन्नईचा विजयी पुनरागमनाचा प्रयत्न! सनरायजर्स हैदराबादशी आज गाठ
Rashid Khan breaks Mohammed Shami's record
GT vs SRH : राशिद खानने शमीचा विक्रम मोडत रचला इतिहास, गुजरातसाठी ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला गोलंदाज
ipl 2024 rajasthan royals vs delhi capitals
IPL 2024 : पंतच्या नेतृत्वाचा कस! दिल्ली कॅपिटल्ससमोर आज राजस्थान रॉयल्सचे आव्हान; फलंदाजांकडून अपेक्षा

प्रो-कबड्डीच्या एका हंगामात सर्वाधिक सुपर १० ची कमाई करणारे चढाईपटू –

नवीन कुमार – २१ (हंगाम सातवा)

प्रदीप नरवाल – १९ (हंगाम पाचवा)

पवन शेरावत – १५ (हंगाम सातवा)

अंतिम फेरीत दिल्लीसमोर बंगालचं आव्हान असणार आहे, त्यामुळे अंतिम फेरीत नवीन आपल्या संघाला विजेतेपद मिळवून देण्यात यशस्वी ठरतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – Pro Kabaddi 7 Semi Final 1 : गतविजेत्या बंगळुरु बुल्सचं आव्हान संपुष्टात, दिल्ली अंतिम फेरीत