पाटणा पायरेट्स संघ हा प्रो-कबड्डीच्या इतिहासातला सर्वात यशस्वी संघ मानला जातो. आतापर्यंत ३ हंगामांची विजेतेपद पाटणा पायरेट्स संघाने पटकावली आहेत. मात्र, सातव्या हंगामात पाटणा पायरेट्सची कामगिरी फारशी चांगली होत नाहीये. प्रदीप नरवालचा अपवाद वगळता एकही खेळाडू आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत नाहीये. सध्याच्या घडीला पाटणा पायरेट्सचा संघ गुणतालिकेत तळातल्या स्थानावर आहे. ४ सप्टेंबररोजी बंगळुरु बुल्सविरुद्ध झालेल्या सामन्यात पाटण्याला एका गुणाच्या फरकाने पराभवाचा सामना करावा लागला. मात्र पाटण्याच्या प्रदीप नरवालने या सामन्यात एक अनोखं अर्धशतक झळकावलं आहे.

बंगळुरु बुल्सविरुद्धच्या सामन्यात प्रदीप नरवालने चढाईत १४ गुणांची कमाई केली. प्रो-कबड्डीच्या इतिहासात प्रदीप नरवालचा हा ५० वा ‘सुपर टेन’ ” ठरला आहे. (एका सामन्यात चढाईत १० किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवण्याला प्रो-कबड्डीत ‘सुपर टेन’ म्हटलं जातं) केवळ ९७ सामन्यांमध्ये प्रदीपने ही कामगिरी करुन दाखवली आहे.

Sourav Ganguly's Reaction to Rohit's Leadership
Sourav Ganguly : “…म्हणून मी रोहित शर्माला कर्णधार बनवलं होतं”, सौरव गांगुलीचा ‘हिटमॅन’बद्दल मोठा खुलासा
Taapsee Pannu reacts on wedding with Mathias Boe
तापसी पन्नू विदेशी बॉयफ्रेंडशी मार्चमध्ये लग्न करणार? अभिनेत्रीने चर्चांवर सोडलं मौन, म्हणाली, “मी कधीही…”
Sambhal SP MP Shafiqur Rahman passed away
संभलचे सपा खासदार शफीकुर रहमान यांचे निधन, वयाच्या ९४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Jan Nicol Loftie Eaton Breaks Kusal Malla's Record
VIDEO : नामिबियाच्या फलंदाजांने झळकावले सर्वात वेगवान शतक, नेपाळविरुद्ध पाडला चौकार-षटकारांचा पाऊस

प्रो कबड्डीत सर्वाधिक सुपरटेन करणारे कबड्डीपटू –

  • प्रदीप नरवाल – ९७ सामने (५० सुपर टेन)
  • राहुल चौधरी – ११३ सामने (३८ सुपर टेन)
  • अजय ठाकूर – ११४ सामने (२९ सुपर टेन)
  • दीपक हुडा – ११६ सामने (२७ सुपर टेन)
  • मणिंदर सिंह – ७१ सामने (२७ सुपर टेन)

काही दिवसांपूर्वीच प्रदीप नरवालने प्रो-कबड्डीच्या इतिहासात चढाईमध्ये ९०० गुणांचा टप्पा ओलांडला होता. अशी कामगिरी करणारा प्रदीप प्रो-कबड्डीच्या इतिहासातला पहिला खेळाडू ठरला होता.