28 September 2020

News Flash

Pro Kabaddi 7 : जाणून घ्या विराट कोहलीच्या संघात कोणत्या खेळाडूला स्थान?

विराटच्या उपस्थितीत मुंबई पर्वाला सुरुवात

प्रो-कबड्डीच्या सातव्या हंगामाच्या मुंबई पर्वाला धडाक्यात सुरुवात झाली आहे. यू मुम्बा विरुद्ध पुणेरी पलटण सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली उपस्थित होता. विराटच्या उपस्थितीतचं मुंबई पर्वाचा श्रीगणेशा करण्यात आला. यावेळी बोलत असताना विराटने आपल्या कबड्डीविषयीच्या आठवणी जागवल्या. भारतीय संघातल्या कोणत्या सात खेळाडूंना तू तुझ्या कबड्डी संघात स्थान देशील असा प्रश्न विचारला असता, विराटने मोठ्या चतुराईने याचं उत्तर दिलं.

धोनीने आपल्या संघात महेंद्रसिंह धोनी, रविंद्र जाडेजा, उमेश यादव, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह, लोकेश राहुलला स्थान दिलं आहे. हे सर्व खेळाडू चपळ असल्याचं विराटने सांगितलं. दरम्यान यू मुम्बाने आपल्या घरच्या मैदानावर खेळत असताना सलामीच्या सामन्यात आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी पुणेरी पलटणला पराभवाचा धक्का दिला आहे. त्यामुळे उर्वरित सामन्यात यू मुम्बाचा संघ कशी कामगिरी करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2019 6:37 pm

Web Title: pro kabaddi 7 virat kohli picks his 7 players for his kabaddi team psd 91
Next Stories
1 Indonesia President Cup – एकतर्फी सामन्यात मेरी कोमची बाजी, पटकावलं सुवर्णपदक
2 चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी मी कधीही तयार – ऋषभ पंत
3 भारतीय संघाला बदलाची गरज, प्रशिक्षकपदासाठी अर्ज केलेल्या रॉबिन सिंहचा शास्त्रींवर निशाणा
Just Now!
X