खेळाडूंच्या दुखापती व सांघिक समन्वयाच्या समस्यांयामुळे आम्हाला गेल्या वर्षी प्रो – कबड्डी लीगमध्ये अपेक्षेइतकी कामगिरी करता आली नाही. यंदा मात्र आम्ही नियोजनबद्ध सरावाच्या जोरावर चांगली कामगिरी करून दाखवू, असा आत्मविश्वास ‘पुणेरी पलटण’ या कबड्डी संघाचा कर्णधार वझिर सिंगने व्यक्त केला.
पुणेरी पलटणच्या नव्या बोधचिन्हाचे अनावरण शुक्रवारी करण्यात आल़े  यावेळी संघाचे नवीन प्रशिक्षक अशोक शिंदे, व्यवस्थापक कैलास कंडपाल व  सिंग उपस्थित होत़े  
 वझिर सिंग म्हणाला की, ‘‘गेल्या वर्षी आम्हाला फक्त बाराच खेळाडूंवर भर द्यावा लागला होता. त्यामुळे अनेक वेळा पूर्णपणे तंदुरुस्त नसतानाही एक दोन खेळाडूंना खेळवावे लागले होते. यंदा एकूण २० खेळाडूंचा संघ राहणार असल्यामुळे जखमी खेळाडूऐवजी पर्यायी खेळाडू उपलब्ध होणार आहे.’’
प्रथमच प्रशिक्षकपदाची धुरा स्वीकारणारे शिंदे म्हणाले की, ‘‘मला या स्पर्धेत प्रशिक्षक म्हणूनच पदार्पण करण्याची संधी आहे. त्याचा फायदा घेत मी संघातील खेळाडूंकडून सर्वोत्तम कामगिरी करून घेण्याचा प्रयत्न करेन. या स्पर्धेला अद्याप भरपूर अवकाश असला तरीही आम्ही यापूर्वीच निवड व नैपुण्य चाचणी आयोजित करीत निवडलेल्या संभाव्य खेळाडूंचे शिबीरही घेत आहोत. गतवर्षी
आम्ही कोठे कमी पडलो, त्या उणिवा दूर करण्यावर मी भर देत आहे.’’