२२ व २३ मे रोजी प्रो कबड्डीचा दिल्लीत लिलाव

प्रो कबड्डी लीगच्या पाचव्या हंगामासाठीचा लिलाव नवी दिल्ली येथे २२ आणि २३ मे रोजी होणार असून, एकंदर साडेतीनशेहून अधिक खेळाडूंचा या लिलावामध्ये समावेश असेल. लीगमध्ये आधीपासून असलेल्या आठ संघांना प्रत्येकी एक खेळाडू कायम ठेवण्याची मुभा देण्यात आली असून, यु मुंबाने कर्णधार अनुप कुमारला, तेलुगू टायटन्सने राहुल चौधरीला तर पाटणा पायरेट्सने प्रदीप नरवालला संघात कायम राखले आहे. जयपूर पिंक पँथर्सने मात्र कोणत्याही खेळाडूला कायम ठेवले नसल्याबद्दल कबड्डीविश्वात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

ahmednagar lok sabha election 2024 marathi news
नगरमध्ये पवार-विखे पारंपारिक संघर्ष वेगळ्या वळणावर!
Shindesena, thane,
शिंदेसेनेचे ठाण्यात पुन्हा एकदा शक्तिप्रदर्शन
External Affairs Minister S Jaishankar asserted that the two armies are fighting for supremacy on the Chinese border
चीन सीमेवर दोन्ही सैन्यांत वर्चस्वासाठी चढाओढ; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे प्रतिपादन
Pune Police Arrest Nigerian Woman in Mumbai for Mephedrone Smuggling
मेफेड्रोन तस्करी प्रकरणात पुणे पोलिसांची कामगिरी; मुंबईत नायजेरियन महिलेला अटक

प्रो कबड्डीच्या आतापर्यंत झालेल्या चारही हंगामांमध्ये अनुपने यु मुंबाचे यशस्वी नेतृत्व केले आहे. पहिल्याच हंगामात सर्वात मौल्यवान खेळाडूचा पुरस्कार पटकावणाऱ्या अनुपने यु मुंबाला तीनदा अंतिम फेरीपर्यंत नेण्याची किमया साधली आहे, याचप्रमाणे दुसऱ्या हंगामात विजेतेपदसुद्धा जिंकून दिले होते. अनुपने गेल्या वर्षी झालेल्या विश्वचषक स्पध्रेतही भारताचे नेतृत्व केले होते. त्यामुळेच अनुपच्या नावाला यु मुंबाने पसंती देणे अपेक्षित होते.

chart

प्रो कबड्डीमधील सर्वात यशस्वी चढाईपटू असा नावलौकिक असलेल्या राहुल चौधरीच्या नावावर चढायांचे पाचशेहून अधिक गुण जमा आहेत. हा पराक्रम करणारा तो एकमेव खेळाडू आहे. तेलुगू टायटन्सनेही अपेक्षेप्रमाणेच राहुलवर विश्वास प्रकट केला आहे. पाटणा पायरेट्सच्या दोन विजेतेपदांमध्ये युवा खेळाडू प्रदीप नरवालचा सिंहाचा वाटा होता. त्यामुळेच त्यांनी प्रदीपला संघात कायम ठेवले आहे.

याशिवाय बंगाल वॉरियर्सने दक्षिण कोरियाचा चढाईपटू यांग कुन ली याला संघात ठेवले आहे. प्रो कबड्डीत सर्वाधिक गुण मिळवणारा आंतरराष्ट्रीय खेळाडू हे त्याचे वैशिष्टय़ आहे. इराणचा कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू मेराज शेखला दबंग दिल्लीने संघात राखले आहे. पुणेरी पलटणनने अष्टपैलू दीपक हुडाला आणि बंगळुरू बुल्सने आशीष कुमारला संघात कायम ठेवले आहे. मुंबईत तळागाळातल्या खेळाडूंच्या गुणवत्तेचा शोध घेणारी एक मोहीम नुकतीच राबवण्यात आली होती. या अभियानातून १३१ नव्या आणि युवा खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.