25 October 2020

News Flash

प्रो-कबड्डीत सहाव्या हंगामासाठी जोगिंदर नरवाल दबंग दिल्लीचा कर्णधार

मिराज शेखऐवजी जोगिंदरवर संघव्यवस्थापनाचा विश्वास

जोगिंदर नरवाल (संग्रहीत छायाचित्र)

प्रो-कबड्डीच्या सहाव्या हंगामासाठी दबंग दिल्लीनेही आपल्या संघात बदल करण्याचं ठरवलं आहे. इराणी अष्टपैलू मिराज शेखऐवजी अनुभवी बचावपटू जोगिंदर नरवालकडे यंदाच्या हंगामाचं नेतृत्व सोपवण्यात आलेलं आहे. प्रो-कबड्डीच्या पहिल्या पर्वापासून दबंग दिल्ली संघाची कामगिरी यथातथाच राहिली आहे. आतापर्यंत दिल्लीचा संघ एकदाही अंतिम ४ जणांच्या गटात पोहचलेला नाहीये. जोगिंदर नरवालने याआधी पुणेरी पलटण, यू मुम्बा, बंगळुरु बुल्स संघाचं प्रतिनिधीत्व केलेलं आहे. त्यामुळे जोगिंदरच्या नेतृत्वाखाली दिल्लीचा संघ चांगली कामगिरी करतो का, याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

अवश्य वाचा – मराठमोळ्या गिरीश मारुती एर्नाककडे पुणेरी पलटण संघाचं नेतृत्व

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2018 6:10 pm

Web Title: pro kabaddi league 2018 dabang delhi name joginder narwal as captain for season 6
Next Stories
1 मराठमोळ्या गिरीश मारुती एर्नाककडे पुणेरी पलटण संघाचं नेतृत्व
2 Asia Cup 2018 : …म्हणून पंचांच्या निर्णयावर व्यक्त व्हायचं टाळलं – महेंद्रसिंह धोनी
3 ‘अँग्री यंग मॅन’ विराट कोहलीचा ‘हा’ ट्रेलर पाहाच…
Just Now!
X