09 August 2020

News Flash

प्रो-कबड्डीत जयपूर पिंक पँथर्स संघाचं नेतृत्व ‘कॅप्टन कूल’ अनुप कुमारकडे

जयपूरच्या संघात तरुण खेळाडूंची फौज

अनुप कुमार (संग्रहीत छायाचित्र)

जयपूर पिंक पँथर्स संघाने प्रो-कबड्डीच्या सहाव्या पर्वासाठी अनुप कुमारला कर्णधारपदाची जबाबदारी दिली आहे. प्रो-कबड्डीतील पहिलं पाच पर्व अनुप कुमार यू मुम्बा संघांचं प्रतिनिधीत्व करत होता. मात्र सहाव्या पर्वासाठी जयपूर पिंक पँथर्स संघाने अनुप कुमारला आपल्या संघात समाविष्ट करुन घेतलं आहे. अनुप कुमारच्या नेतृत्वाखालीच यू मुम्बा संघाने प्रो-कबड्डीच्या दुसऱ्या पर्वाचं विजेतेपद पटकावलं होतं.

अवश्य वाचा – मराठमोळ्या गिरीश मारुती एर्नाककडे पुणेरी पलटण संघाचं नेतृत्व

पहिल्या ५ पर्वांच्या काळात अनुप कुमारने ७८ सामन्यांमध्ये ५४६ गुणांची कमाई केली आहे. याचसोबत २०१० आणि २०१४ साली झालेले आशियाई खेळ व २०१६ साली झालेल्या कबड्डी विश्वचषकात अनुप कुमारच्या नेतृत्वाखालीच भारताने विजेतेपद पटकावलं होतं. मात्र पाचव्या पर्वात यू मुम्बाला पहिल्यांदा बाद फेरीत प्रवेश करता आला नव्हता, मागच्या हंगामात अनुपलाही आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे सहाव्या हंगामासाठी जयपूरने ३० लाखांच्या बोलीवर अनुपला आपल्या संघात घेतलं होतं. यंदा अनुपसोबत जयपूरच्या संघात दिपक निवास हुडा, मोहीत छिल्लर, संदीप कुमार धूल यासारखे खेळाडू असणार आहेत.

अवश्य वाचा – प्रो-कबड्डीत सहाव्या हंगामासाठी जोगिंदर नरवाल दबंग दिल्लीचा कर्णधार

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2018 3:52 pm

Web Title: pro kabaddi league 2018 jaipur pink panthers announce anup kumar as captain for season 6
टॅग Anup Kumar
Next Stories
1 BLOG : फायटिंग स्पिरीटवाला अफगाण संघ भविष्यातील ‘जायंट किलर’
2 Asia Cup 2018 : फलंदाजाच्या अपयशामुळे आमचा पराभव – पाक कर्णधार सर्फराजची खंत
3 पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघात दोन उपकर्णधार
Just Now!
X