प्रो-कबड्डीच्या सहाव्या हंगामात सेनादलाचा चढाईपटू रोहित कुमारकडे बंगळुरु बुल्सचं नेतृत्व देण्यात आलेलं आहे. तिसऱ्या हंगामात रोहितने पटणा पायरेट्स संघाकडून खेळताना प्रो-कबड्डीचं विजेतेपद मिळवलं होतं. यानंतर चौथ्या हंगामापासून रोहित कुमार बंगळुरुच्या संघात खेळतो आहे. रणधीर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणारा बंगळुरुचा संघ यंदाच्या हंगामात आपली कामगिरी सुधारण्याचा प्रयत्न करणार आहे. पाचव्या हंगामात बंगळुरुचा संघ चौथ्या क्रमांकावर राहिला होता, त्यामुळे बाद फेरीत प्रवेश करण्याचं त्यांचं स्वप्न भंगलं होतं. २८ वर्षीय रोहित कुमारकडे संघाचं प्रतिनिधीत्व करण्याची पुरेपूर ताकद असल्यामुळे यंदा पुन्हा एकदा रोहितवर कर्णधारपदाची जबाबदारी टाकण्यात आलेली आहे. १० ऑक्टोबरला बंगळुरु बुल्स आपला पहिला सामना तामिळ थलायवाजशी खेळणार आहे.

Yashasvi Jaiswal is the first player to score two centuries in IPL before turning 23
IPL 2024: यशस्वीने एकाच शतकासह रचला इतिहास, आयपीएलमध्ये ही कामगिरी करणारा ठरला पहिला फलंदाज
Mallikarjun Kharge interview Congress loksabha elections 2024 PM Narendra Modi BJP
इंडिया आघाडी जिंकली तर नेतृत्व कोण करणार? मल्लिकार्जुन खरगेंनी केला खुलासा
IPL 2024 Lucknow Super Gitans vs Gurajat Titans Match Updates in Marathi
IPL 2024: ‘तूही माझ्या स्ट्राईक रेटची खिल्ली उडवणार का?’, लखनौने विजयानंतर केएल राहुलचा शेअर केला भन्नाट व्हीडिओ
Rashid Khan breaks Mohammed Shami's record
GT vs SRH : राशिद खानने शमीचा विक्रम मोडत रचला इतिहास, गुजरातसाठी ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला गोलंदाज