Amature Kabaddi Fedreation of India ने प्रो-कबड्डीच्या सहाव्या हंगामाची तारीख आज अधिकृतरित्या जाहीर केलेली आहे. १९ ऑक्टोबर पासून यंदाचा हंगाम सुरु होणार असून २० जानेवारीला यंदाच्या हंगामाचा अंतिम सामना रंगणार आहे. प्रो-कबड्डीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या असल्या तरीही फेडरेशनने Kabaddi Nationals आणि Fedreation Cup या दोन महत्वाच्या स्पर्धांच्या तारखा अद्याप जाहीर केल्या नाहीयेत.

गेल्या ५ हंगामांमध्ये कबड्डीने भारतीय चाहत्यांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे. गेल्या काही वर्षांमध्ये कबड्डी हा क्रिकेट व्यतिरीक्त सर्वात जास्त पाहिला जाणारा खेळ ठरला आहे. यंदाच्या हंगामात सेनादलाच्या मोनू गोयतला सर्वाधिक १.५१ कोटींची बोली लावण्यात आली होती. हरयाणा स्टिलर्सने मोनूला आपल्या ताफ्यात दाखल करुन घेतलं आहे. याव्यतिरीक्त राहुल चौधरी, दिपक निवास हुडा, नितीन तोमर, रिशांक देवाडीगा आणि फैजल अत्राचली यांनाही यंदाच्या हंगामात कोटींच्या बोली लागलेल्या आहेत.