25 September 2020

News Flash

प्रो कबड्डी लीग : फझल अत्राचली यू मुंबाचा कर्णधार

यू मुंबाने इराणचा खेळाडू फझल अत्राचली याच्याकडे संघाचे नेतृत्व सोपवले आहे.

| July 18, 2019 12:33 am

मुंबई : २० जुलैपासून सुरू होणाऱ्या प्रो-कबड्डी लीगच्या सातव्या हंगामासाठी यू मुंबाने इराणचा खेळाडू फझल अत्राचली याच्याकडे संघाचे नेतृत्व सोपवले आहे. त्याचबरोबर उपकर्णधारपदी संदीप नरवाल याची नियुक्ती केली आहे.

‘‘यू मुंबा कबड्डी संघाच्या कर्णधारपदी माझी निवड झाल्याने मी प्रेरित झालो आहे. संघाला विजेतेपदापर्यंत पोहोचवण्याचे माझे ध्येय आहे. अचूक रणनीती आणि संघात शिस्त असणे गरजेचे असून प्रत्येक खेळाडू यू मुंबासाठी मैदानात जीव ओतून कामगिरी करेल. त्याचबरोबर संघाला सातव्या मोसमाचे विजेतेपद मिळवून देत स्वत:च्या गुणवत्तेचा ठसा उमटवेल, अशी आशा आहे,’’ असे अत्राचली याने म्हटले आहे.

उपकर्णधारपदी निवडण्यात आलेला हरयाणातील सोनिपत येथील संदीप नरवाल याच्यावर रणनीतीची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी असेल. यू मुंबाचा सलामीचा सामना २० जुलै रोजी तेलुगू टायटन्सशी होणार आहे.

पुणेरी पलटणचे नेतृत्व सुरजितकडे

पुणे : सातव्या मोसमासाठी पुणेरी पलटणच्या कर्णधारपदी सुरजित सिंग याची निवड करण्यात आली आहे. तिसऱ्या मोसमात सुरजितने पुणेरी पलटणचा बचावपटू म्हणून काम पाहिले होते. सुरजितच्या नेतृत्वाखालील पुणेरी पलटण संघात नितीन तोमर, गिरीश इरनाक, पवन कुमार आणि दर्शन कडियान यांसारख्या खेळाडूंचा समावेश आहे. पुणेरी पलटणचा पहिला सामना २२ जुलै रोजी हरयाणा स्टीलर्सशी होणार आहे. या वेळी पुणेरी संघाचे मुख्य प्रशिक्षक अनुप कुमार म्हणाले की, ‘‘सुरजित संघाला विजेतेपदापर्यंत घेऊन जाईल, असा विश्वास आहे. त्याच्या अनुभव आणि नेतृत्व क्षमतेवर आम्हाला कोणतीही शंका नाही. पुणे संघ यंदा चांगली कामगिरी करेल.’’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 18, 2019 12:33 am

Web Title: pro kabaddi league 2019 fazel atrachali become captain of u mumba zws 70
Next Stories
1 भारत ‘अ’ संघाची मालिकेत विजयी आघाडी
2 इंडोनेशिया खुली बॅडमिंटन स्पर्धा : सिंधू, श्रीकांतची विजयी सलामी
3 हिमाची आणखी एक सुवर्ण कामगिरी ; १५ दिवसात जिंकले चौथे सुवर्ण पदक
Just Now!
X