30 October 2020

News Flash

प्रो कबड्डी लीग : बंगाल वॉरियर्सची यू मुंबावर मात

बंगाल वॉरियर्सने दुसऱ्या सत्रात जोरदार मुसंडी मारताना यू मुंबावर ३२-३० असा रोमहर्षक विजय मिळवला

 पाटणा : प्रो कबड्डी लीगच्या पाटण्यामधील टप्प्याच्या अखेरच्या दिवशी पहिल्या सत्रात पिछाडीवर राहिलेल्या बंगाल वॉरियर्सने दुसऱ्या सत्रात जोरदार मुसंडी मारताना यू मुंबावर ३२-३० असा रोमहर्षक विजय मिळवला. दुसऱ्या सामन्यात पाटणा पायरेट्सने यूपी योद्धावर ४१-२० असा शानदार विजय मिळवला.

पाटलीपुत्र इनडोअर स्टेडियमवर झालेल्या पहिल्या सामन्यात यू मुंबाने १६-११ अशी मध्यंतराला आघाडी घेतली होती; परंतु दुसऱ्या सत्रात बंगालने सामन्यामधील रंगत वाढवली. के. प्रपंजन (६ गुण), मणिंदर सिंग (५ गुण) आणि बलदेव सिंग (५ गुण) हे बंगालच्या विजयाचे शिल्पकार ठरले. यू मुंबाकडून अर्जुन देशवालने १० गुण मिळवून लक्षवेधी कामगिरी केली.

दुसऱ्या सामन्यात पाटण्याने पहिल्याच सत्रात २४-९ अशी आघाडी घेत यूपीला डोके वर काढण्याची संधी दिली नाही. दुसऱ्या सत्रातही पाटण्याचे वर्चस्व यूपीला भेदता आले नाही. प्रदीप नरवालने चढायांचे १४ गुण मिळवून पाटण्याच्या यशात सिंहाचा वाटा उचलला. नीरज कुमारने ८ गुण मिळवून त्याला छान साथ दिली. यूपी योद्धाकडून सुमीत आणि मोनू गोयतने बरा खेळ केला.

आजचे सामने

*  बेंगळूरु बुल्स वि. हरयाणा स्टीलर्स

* गुजरात फॉच्र्युनजायंट्स वि. तेलुगू टायटन्स

*  वेळ : सायंकाळी ७.३० वा.

* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स फर्स्ट, स्टार स्पोर्ट्स २, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी, स्टार स्पोर्ट्स १ मराठी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 10, 2019 1:35 am

Web Title: pro kabaddi league bengal warriors beat u mumba zws 70
Next Stories
1 “मला मदत करा…”; द्युती चंद हिची परराष्ट्र मंत्र्यांना विनंती
2 ऐतिहासिक! आता क्रिकेट संघात दिसणार ट्रान्सजेंडर खेळाडू
3 डोपिंग टेस्टसाठी दिलं गर्लफ्रेंडचं युरीन सँपल, आणि…
Just Now!
X