News Flash

यू मुंबाला नमवून पाटण्याची मुसंडी

संदीप नरवाल, डी. सुरेश कुमार आणि सुनील कुमार यांनी अप्रतिम पकडी केल्या.

दिमाखदार सांघिक कामगिरी बजावत पाटणा पायरेट्सने प्रथमच गतविजेत्या यू मुंबाचा ४०-२६ असा धुव्वा उडवून प्रो कबड्डी लीगमधील सलग तिसऱ्या विजयासह जोरदार मुसंडी मारली आहे. दुसऱ्या लढतीत तेलुगू टायटन्सने बंगळुरू बुल्सवर ३५-२६ असा दणदणीत विजय मिळवला.
सामन्याच्या दुसऱ्या मिनिटाला राजेश मोंडलने एका चढाईत चार गुण घेतल्यानंतर यू मुंबा संघाचा आत्मविश्वास हरवला आणि पाटण्याने त्यांच्यावर दोन लोण चढवले. मोंडल आणि प्रदीप नरवाल यांनी चढायांचे प्रत्येकी आठ गुण मिळवले. संदीप नरवाल, डी. सुरेश कुमार आणि सुनील कुमार यांनी अप्रतिम पकडी केल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 7, 2016 12:37 am

Web Title: pro kabaddi league patna pirates beat u mumba 40 26
टॅग : Pro Kabaddi League
Next Stories
1 अंडर १९ वर्ल्ड कप: भारतीय संघ उपांत्य फेरीत
2 आयपीएल लिलाव : वॉट्सन ९.५, युवराजला ७ कोटी
3 सट्टेबाजीला मान्यता द्यावी – अजय शिर्के
Just Now!
X