28 February 2021

News Flash

Pro Kabaddi Season 7 : राकेश कुमार हरियाणा स्टिलर्सच्या प्रशिक्षकपदी

पुणेरी पलटणपाठोपाठ हरियाणाच्या संघातही बदल

प्रो-कबड्डीच्या सातव्या हंगामात पुणेरी पलटण पाठोपाठ हरियाणा स्टिलर्स संघानेही नवीन प्रशिक्षकांना संधी देण्याचं ठरवलं आहे. भारताचा अनुभवी कबड्डीपटू राकेश कुमार आगामी हंगामात हरियाणाच्या संघाला प्रशिक्षण देणार आहे. रामबीरसिंह खोकर यांच्याजागी राकेश कुमार हरियाणाच्या खेळाडूंना मार्गदर्शन देणार आहे. प्रो-कबड्डीत राकेश कुमारने यू मुम्बा, पाटणा पायरेट्स संघाचं नेतृत्व केलं आहे. यानंतर त्याने कबड्डीमधून निवृत्ती स्विकारली. सहाव्या हंगामात राकेश समालोचकाच्या भूमिकेतही दिसला होता.

सातव्या हंगामात नवीन जबाबदारीबद्दल बोलत असताना अनुप म्हणाला, “पुन्हा एकदा प्रो-कबड्डीच्या मैदानावर उतरायला मिळतंय याचा मला आनंद आहे. या हंगामात हरियाणाच्या संघाला विजेतेपद मिळवून देण्याचा माझा प्रयत्न असेल. या संधीबाबत मी व्यवस्थापनाचे आभार मानतो.” राकेशच्या अनुभवाचा संघाला नक्की फायदा होईल, याचसोबत खेळाडूंमध्ये विजयाची नवीन आशा निर्माण करण्याचं काम राकेश कुमार करेल असा आत्मविश्वास हरियाणाच्या संघ व्यवस्थापनाने बोलून दाखवला.

अवश्य वाचा – Pro Kabaddi Season 7 : अनुप कुमारची पुणेरी पलटणच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड

सहाव्या हंगामात हरियाणा स्टिलर्स संघाची कामगिरी फारशी चांगली झाली नव्हती. बाद फेरीत स्थान मिळवण्यात हरियाणाचा संघ अपयशी ठरला होता. राकेश कुमारकडे प्रो-कबड्डीत ५५ सामन्यांचा अनुभव आहे. त्यामुळे राकेशच्या मार्गदर्शनाखाली हरियाणाचा संघ यंदाच्या हंगामात कशी कामगिरी करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 7, 2019 6:25 pm

Web Title: pro kabaddi league rakesh kumar appointed as haryana steelers head coach
Next Stories
1 श्रेयसच्या अर्धशतकाने दिल्ली विजयी, बंगळुरुच्या पदरात सलग सहावा पराभव
2 Video : जेव्हा ‘कॅप्टन कूल’ धोनी मैदानात चहरवर भडकतो
3 IPL 2019 : मुंबईने सामना जिंकूनही सचिन नाराज, जाणून घ्या कारण
Just Now!
X