News Flash

कबड्डी.. कबड्डी..

आंग्ल खेळांच्या भाऊगर्दीत हरवलेला आणि व्यावसायिकतेच्या गणितांना अजाण असलेला खेळ म्हणून पाहिली जाणारी मातीतील कबड्डी आता ‘ग्लॅमर’च्या ‘गालिच्या’वर अवतरत आहे. क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, बॅडमिंटन या

| July 26, 2014 04:50 am

आंग्ल खेळांच्या भाऊगर्दीत हरवलेला आणि व्यावसायिकतेच्या गणितांना अजाण असलेला खेळ म्हणून पाहिली जाणारी मातीतील कबड्डी आता ‘ग्लॅमर’च्या ‘गालिच्या’वर अवतरत आहे. क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, बॅडमिंटन या आधीच वलय असलेल्या खेळांना अधिक झगमगते रूप देणारी लीग स्पर्धा आता कबड्डीतही येत आहे. ज्या गिरणगावच्या मातीत ‘कबड्डी कबड्डी’चा दम घुमत असे, त्याच गिरणगावातील वरळीच्या एनएससीआयच्या भव्य क्रीडा संकुलात आकर्षक रंगसंगती, दिव्यांचा लखलखाट आणि सेलिब्रिटींच्या उपस्थितीत ‘प्रो-कबड्डी लीग’च्या रुपात कबड्डीतले नवे पर्व सुरू होत आहे. भारतातील आठ फ्रँचायझी संघ, ६० सामने आणि एक कोटी रुपयांचे इनाम असलेल्या या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्सवरून होणार आहे.
संघ
बंगाल वॉरियर्स, बंगळुरू बुल्स, दबंग दिल्ली, जयपूर पिंक पँथर्स, पटणा पायरेट्स, पुणेरी पलटण, तेलुगू टायटन्स, यू मुंबा
*स्पर्धेला केंद्रीय युवा आणि क्रीडा मंत्रालयाची मान्यता
*प्रेक्षकांच्या सोयीसाठी रिप्लेची तरतूद
*अभिषेक बच्चनच्या संघामुळे बॉलीवूडमध्ये उत्सुकता
*दुखापती होऊ नयेत यासाठी खास स्वरुपाच्या मॅटची व्यवस्था

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2014 4:50 am

Web Title: pro kabaddi league today
Next Stories
1 BLOG : इशांतचे कौतुक करायचे का?
2 अभिनवचा सुवर्णवेध
3 सुवर्ण लिफ्टिंग
Just Now!
X