19 September 2018

News Flash

अक्षय जाधवचं भविष्य उज्वल, पुण्याच्या प्रशिक्षकांकडून अक्षयच्या कामगिरीचं कौतुक

पुण्याची आज पाटण्याशी लढत

उत्तर प्रदेशविरुद्धच्या सामन्यादरम्यान पुणेरी पलटण संघाचा अक्षय जाधव

प्रो-कबड्डीचा पाचवा हंगाम सध्या बाद फेरीत पोहचला आहे. मुंबईच्या वरळी परिसरातील एनएससीआयच्या मैदानात सध्या बाद फेरीचे सामने सुरु आहेत. पहिला दिवस कबड्डी रसिकांच्या लक्षात राहिला तो पाटणा पायरेट्सने हरियाणा संघावर केलेली मात, आणि कर्णधार प्रदीप नरवालने एका चढाईत मिळवलेल्या ८ गुणांमुळे. मात्र, या सामन्याआधी झालेल्या अटीतटीच्या सामन्यात पुणेरी पलटणने उत्तर प्रदेश योद्धाजचे आव्हान मोडून काढले. ४०-३८ अशा फरकाने विजय मिळवत पुण्याच्या संघाने पुढच्या फेरीत प्रवेश केला. आज पुण्याचा सामना गतविजेत्या पाटणा पायरेट्सशी होणार आहे.

शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या कालच्या सामन्यात पुण्यासाठी हिरो ठरला तो कर्णधार दीपक हुडा. दीपकने सामन्यात चढाईत १० गुणांची कमाई करत आपल्या संघाचं सामन्यातलं आव्हान शेवटपर्यंत कायम ठेवलं. मोक्याच्या क्षणी उत्तर प्रदेशच्या संघाने सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पुण्याच्या बचावपटूंनी तो प्रयत्न हाणून पाडला. या सामन्यात मराठमोळ्या अक्षय जाधवनेही आपल्या कामगिरीने सर्वांची वाहवा मिळवली. अक्षय जाधवने कालच्या सामन्यात आपल्या कर्णधाराला साथ देत चढाईत ६ गुण कमावले.

अवश्य वाचा – अशा पद्धतीने रंगतील प्रो-कबड्डीच्या प्ले-ऑफचे सामने; ‘या’ संघाला थेट अंतिम सामन्यात प्रवेश

HOT DEALS
  • Moto Z2 Play 64 GB Fine Gold
    ₹ 16230 MRP ₹ 29999 -46%
    ₹2300 Cashback
  • Lenovo Phab 2 Plus 32GB Gunmetal Grey
    ₹ 17999 MRP ₹ 17999 -0%

सामना संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पुण्याचे प्रशिक्षक बी.सी. रमेश यांनी अक्षय जाधवच्या खेळाचं कौतुक केलं. अक्षय हा आमच्या संघासाठी हुकुमाचा एक्का ठरतोय. एखाद्या अष्टपैलू खेळाडूसारखी सध्याची त्याची कामगिरी आहे. महत्वाची गोष्ट आपल्या मुख्य चढाईपटूला योग्य साथ देत तो आपलं योगदान देत असतो. सुरुवातीला पुणेरी पलटण संघाकडून गुरुनाथ मोरे हा महाराष्ट्राचा खेळाडू दीपक हुडासोबत चढाईची भूमिका सांभाळायचा. मात्र, तो आजारी पडल्यामुळे त्याला उरलेल्या हंगामावर पाणी सोडावं लागलं. गुरुनाथच्या अनुपस्थितीत अक्षय जाधवला संघात स्थान मिळालं आणि आपल्याला मिळालेल्या संधीचा अक्षयने पुरेपूर फायदा करुन घेतला असल्याचं बी.सी. रमेश यांनी सांगितलं.

उत्तर प्रदेशविरुद्धच्या सामन्यात अक्षय जाधव आणि पुण्याच्या बचावपटूंना सुचना देताना पुण्याचे प्रशिक्षक बी.सी. रमेश

 

आतापर्यंत प्रो-कबड्डीच्या पाचव्या हंगामात अक्षय जाधव पुणेरी पलटण संघाकडून ९ सामने खेळले आहेत. यात अक्षयने चढाईत ९ तर बचावात १२ गुणांची कमाई केली आहे. अक्षयला अजून बराच मोठा पल्ला गाठायचा आहे. सकारात्मक बाब म्हणजे अक्षय जितकी चांगली चढाई करतो तितकाच तो बचावही चांगला करतो. त्यामुळे मी त्याला कोपरा, कव्हर यासारख्या कोणत्याही जागेवर खेळवू शकतो. अक्षयचा एकंदर खेळ पाहता त्याचं भविष्य नक्कीच उज्वल असल्याचं पुण्याच्या प्रशिक्षकांनी नमूद केलं.

अवश्य वाचा – Pro Kabaddi Season 5 – अटीतटीच्या लढाईत पुण्याची उत्तर प्रदेशवर मात, दीपक हुडा-गिरीश एर्नेक चमकले

उत्तर प्रदेशवर मात केल्यानंतर आज पुण्याची गाठ पाटणा पायरेट्सशी पडणार आहे. पाटण्याने गेल्या दोन हंगामाचं विजेतेपद पटकावलं आहे. याचसोबत आपल्या पहिल्या सामन्यात त्यांनी हरियाणाचा धुव्वा उडवला होता. त्यामुळे अंतिम फेरी गाठण्यासाठी पुणेरी पलटण आणि पाटणा पायरेट्स या दोन्ही संघांसाठी हा सामना महत्वाचा मानला जातोय. त्यामुळे आजच्या सामन्यात अक्षय जाधव आपल्या अष्टपैलू खेळीने संघाला विजय मिळवून देतो का हे पहावं लागेल.

First Published on October 24, 2017 4:06 pm

Web Title: pro kabaddi season 5 akshay jadhav has a bright future says puneri paltan coach b c ramesh