News Flash

Pro Kabaddi Season 5 – बंगालच्या वाघाचा धुमाकूळ, उत्तर प्रदेश पराभूत

बंगालच्या झंझावाती खेळापुढे उत्तर प्रदेश निष्रभ

बंगालचा अष्टपैलू खेळ, उत्तर प्रदेश २० गुणांच्या फरकाने पराभूत

सुरजित सिंहच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या बंगाल वॉरियर्सच्या संघाने यंदाच्या हंगामात सर्वात मोठा विजय मिळवला आहे. नवोदीत खेळाडूंचा भरणा असलेल्या यूपी योद्धाजच्या संघावर बंगालच्या संघाने ४०-२० अशी मात केली. बंगालच्या संघाने रेडींग, डिफेन्स अशा दोन्ही डिपार्टमेंटमध्ये अष्टपैलू खेळ करत संपूर्ण सामन्यात उत्तर प्रदेशच्या संघाला सामन्यात डोकंच वर काढून दिलं नाही. या सामन्यात बंगालच्या संघाने उत्तर प्रदेशच्या संघाला एकूण ३ वेळा ऑलआऊट केलं.

बंगाल वॉरियर्सकडून आज मणिंदर सिंह ने ८, कोरिअन खेळाडू जांग कून लीने ७ अष्टपैलू खेळाडू विनोद कुमारने रेडींग आणि बचावात मिळून ८ पॉईंट मिळवले. बंगालच्या रेडर्सच्या झंजावातापुढे यूपी योद्धाजचा संघ विखुरलेला पहायला मिळाला, ज्याचा फायदा बंगालच्या रेडर्सनी संपूर्ण सामन्यात घेतला.
यासोबतीला बंगालच्या बचावफळीतल्या रण सिंहनेही आजच्या सामन्यात धडाकेबाज खेळी केली. संपूर्ण सामन्यात रण सिंहने ५ पॉईंट मिळवले. त्याला श्रीकांत तेवतीयाने १ तर कर्णधार सुरजित सिंहने २ पॉईंट घेत चांगली साथ दिली.

उत्तर प्रदेशच्या कोणत्याही खेळाडूकडून आज चांगला खेळ झाला नाही. कर्णधार नितीन तोमरला सामन्यात अवघा १ गुण मिळवता आला. संघाचा महत्वाचा रेडर जिथे १ पॉईंट मिळवतो तिकडे इतर खेळाडूंची झालेली अवस्था आपण समजू शकतो. उत्तर प्रदेशकडून सुरिंदरने सिंहने ५ पॉईंट मिळवत किल्ला लढवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला यश आलं नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 6, 2017 9:40 pm

Web Title: pro kabaddi season 5 bengal warriors vs up yoddhas match review
Next Stories
1 सामनावीराचा किताब मिळवूनही श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत जडेजावर बंदी
2 कोलंबोत भारताचा विजय, आणि कर्णधार कोहली ठरला ‘या’ विक्रमाचा मानकरी
3 तुला हसवू शकलो हेच आमचं यश; वीरुच्या भेटीनंतर हरमनप्रीतची प्रतिक्रिया
Just Now!
X